डोंबिवलीत कचरा मुक्तीची मोहीम, 21 जानेवारीला स्वीकारला जाणार सर्व प्रकारचा कचरा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 06:49 PM2018-01-15T18:49:37+5:302018-01-15T18:49:57+5:30
कचरा मुक्तीसाठी प्रयत्न करणा-या अर्पणा कवी यांच्या पुढाकाराने इनरव्हील क्लबच्या वतीने कचरा मुक्तीची मोहिम राबविली जात आहे. सर्व प्रकारचा कचरा 21 तारखेला डोंबिवलीच्या ओंकार इंटरनॅशनल स्कूलमध्ये सकाळी 10 ते 12 वाजताच्या वेळेत स्वीकारला जाणार आहे. या मोहिमेत जवळपास 25 स्वयंसेवक व चार संस्था कार्यरत आहेत.
डोंबिवली - कचरा मुक्तीसाठी प्रयत्न करणा-या अर्पणा कवी यांच्या पुढाकाराने इनरव्हील क्लबच्या वतीने कचरा मुक्तीची मोहिम राबविली जात आहे. सर्व प्रकारचा कचरा 21 तारखेला डोंबिवलीच्या ओंकार इंटरनॅशनल स्कूलमध्ये सकाळी 10 ते 12 वाजताच्या वेळेत स्वीकारला जाणार आहे. या मोहिमेत जवळपास 25 स्वयंसेवक व चार संस्था कार्यरत आहेत. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी सगळ्य़ांनी त्याठिकाणी कचरा नेऊन दिल्यास कचरा मुक्तीची मोहिम पुढे जाण्यास हातभार लागणार असल्याचे आवाहन कवी यांनी केले आहे.
या मोहिमेत इनरव्हील क्लब सह रोटरी, रोटरॅक्ट व डोंबिवली मिलापनगर असोसिएशन यांचा सहभाग आहे. यापूर्वीही त्यांनी असा उपक्रम हाती घेतला होता. त्यातून त्यांनी 38 किलो ई कचरा, 43 किलो प्लॅस्टीकचा कचरा आणि 9 ते 1क् थर्माेकोलच्या शीट मिळाल्या होत्या. या उपक्रमासाठी कवी यांना ओंकार इंटरनॅशनल शाळेत एक जागा मिळाली आहे. या वेळीस ई कचरा, प्लॅस्टीक, थर्मोकोलसह कपडे, चप्पल बूट आदी स्वरुपाचा कचरा स्विकारला जाणार आहे. डोंबिवलीतील उर्जा फाऊंडेशनही प्लॅस्टीक मुक्तीसाठी कार्य करीत आहे. त्यांचे कार्य केवळ शहरी भागापूरते मर्यादीत आहे. त्यामुळे त्यांचा संपर्क डोंबिवली औद्योगिक वसाहतीत नाही. डोंबिवली औद्योगिक वसाहतीत जागरुक व सजग नागरीक कवी यांनी त्याला सुरुवात केली आहे. त्यांच्या या उपक्रमास चार संस्थांची प्रबळ साथ मिळाली. सुरुवातीला 21 स्वयंसेवकांनी त्यात सहभाग घेतला. 21 जानेवारीच्या मोहिमेत 25 स्वयंसेवक सहभागी होतील असा दावा कवी यांनी केला आहे. गोळा करण्यात येणा:या ई कच:यावर गुंज ही संस्था शास्त्रोक्त प्रक्रिया करुन विल्हेवाट लावणार आहे. शीळ फाटा येथील सुजाता कोळमकर व मीनल लेले यांच्याकडून चालविण्यात येणा:या प्लॅस्टीक रिसायकलींग प्रकल्पात प्लॅस्टीक कचरा पाठविला जाणार आहे. सुका कच:यावर प्रक्रिया होण्यास त्यातून मदत होणार आहे. सुका कचरा कमी होण्यास हातभार लागणार आहे. उर्वरीत कच:यापासून खत तयार केले जाणार आहे. उर्जा फाऊंडेशन दर 4क् दिवसांनी प्लॅस्टीक कचरा गोळा करण्याचा ड्राईव्ह घेते. तर कवी यांच्या करवी चार संस्था या दर 3क् दिवसांनी हा ड्राईव्ह घेणार आहे. तसेच आठवडय़ाला दर गुरुवार हा सुक्या कच:यासाठी ठरवून दिला जाणार आहे. तर ओल्या कच:यासाठी आठवडय़ातील इतर दिवस ठरविले जाणार आहेत. महापालिकेने या उपक्रमाला हातभार लावणो गरजेचे आहे. महापालिकेकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याचे कारण महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येते. त्याचा सहभाग असला तर ही मोहिम अधिक प्रभावी होऊ शकते असा दावा कवी यांनी केला आहे. पहिल्या ड्राईव्हला 48 नागरीकांनी प्रतिसाद दिला होता. आत्ता 21जानेवारीला हा प्रतिसाद अधिक संख्येने वाढण्याची शक्यता आयोजकांनी केली आहे. महापालिकेच्या इतर प्रभागातही अशा प्रकारचा ड्राईव्ह घेण्याचा मानस कवी व त्यांच्यावतीने काम करणा:या चारही संस्थांच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.