डोंबिवली महापालिका हवी; मान्यवरांनी वेधले राज्यमंत्र्यांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 12:37 AM2019-06-04T00:37:52+5:302019-06-04T00:38:02+5:30

समस्यांमध्ये वाहतूककोंडी, फेरीवाले, रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा, कोपर उड्डाणपूल, रस्त्यांची दुरुस्ती याकडे लक्ष वेधताना प्रशासकीय यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावाचा मुद्दा येथे प्रकर्षाने मांडला.

Dombivli Municipal Corporation; The attention of the dignitaries, the dignitaries | डोंबिवली महापालिका हवी; मान्यवरांनी वेधले राज्यमंत्र्यांचे लक्ष

डोंबिवली महापालिका हवी; मान्यवरांनी वेधले राज्यमंत्र्यांचे लक्ष

Next

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली या शहरांची संस्कृती भिन्न आहे. वाढत्या नागरिकीक रणामुळे मूलभूत सुविधांचा सध्या पुरता बोजवारा उडाला आहे. त्यामुळे वाढती लोकसंख्या पाहता डोंबिवलीची स्वतंत्र महापालिका व्हावी, अशी मागणी मान्यवरांनी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली. शनिवारी येथील ब्राह्मण सभागृहात चव्हाण यांनी शहरातील सामाजिक संस्था, मान्यवर यांची विशेष बैठक बोलावली होती. त्या बैठकीत शहरातील समस्यांकडे लक्ष वेधताना ही मागणी करण्यात आली.

चव्हाण यांनी नगरसेवक ते आमदार या आतापर्यंतच्या कारकिर्दीत शहरात कोणकोणते उपक्रम राबवले तसेच भविष्यात हाती घेतल्या जाणाऱ्या योजनांची माहिती देण्यासाठी तसेच उपस्थितांच्या सूचना आणि मार्गदर्शनासाठी ही बैठक आयोजित केली होती. यावेळी चव्हाण यांच्यासह मधुकर चक्रदेव, ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, दीपक मेजारी, स्नेहल दीक्षित, दर्शना सामंत, माधव जोशी, विवेक पंडित आदी उपस्थित होते. व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांनी शहरात भेडसावणाºया समस्या मांडताना ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. समस्यांमध्ये वाहतूककोंडी, फेरीवाले, रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा, कोपर उड्डाणपूल, रस्त्यांची दुरुस्ती याकडे लक्ष वेधताना प्रशासकीय यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावाचा मुद्दा येथे प्रकर्षाने मांडला. यावेळी नगरसेवकांच्या प्रभागातील कामकाजाबाबतही नाराजी व्यक्त केली. त्यांना जे चांगले वाटते तेच करतात, पण नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात. नागरिकच सेवक झाले असल्याची भावना व्यक्त करण्यात आली, तर श्रेयवादाचा मुद्दाही यावेळी मान्यवरांकडून मांडण्यात आला. सावित्रीबाई फुले कलामंदिर लवकर सुरू व्हावे, अशीही मागणी करण्यात आली. दरम्यान, लोकसभेला डोंबिवलीतून मतदान कमी झाले. येथून भरभरून मतदान झाले पाहिजे. मतदारयादीत नाव आहे की नाही, याचीही दक्षता घ्यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

‘समस्यांचे लवकरच निराकरण होईल’
शहरात पहिले नागरिकीकरण झाले, मग पायाभूत सुविधांचा विचार केला गेला. सध्या कल्याण-शीळ मार्गावरील प्रस्तावित पलावा, पत्रीपुलाचे काम लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न राहणार आहे. जोशी हायस्कूल येथील उड्डाणपूल, ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावर एलिव्हेटेड स्वरू पात उतरवला जाणार आहे. मोठागाव-माणकोली उड्डाणपुलाचे कामही सुरू आहे. रिंगरूटच्या कामाला गती येणार आहे. दुर्गाडीच्या कामातही सरकारने विशेष लक्ष वेधले आहे. त्यामुळे लवकरच शहराची वाहतूककोंडीतून मुक्तता होईल, असा दावा चव्हाण यांनी केला. रेल्वेतील सरकते जिने तसेच फलाटांची उंची वाढवणे, ही कामे माझ्याच पुढाकाराने झाली. नागरी सुविधा, आरोग्य सुविधाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. कल्याण ग्रामीणमध्ये प्रस्तावित ग्रोथ सेंटरच्या माध्यमातून आयटी क्षेत्रातील ५० हजार मुलांना रोजगार मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शहराबाबत नेहमीच सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे. डोंबिवली शहर हे चांगले आहे, असेच म्हटले पाहिजे, असेही चव्हाण म्हणाले.

उद्धव ठाकरे यांना विसर
बालभवनच्या शुभारंभप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी येथे तारांगण उभारण्याचे आश्वासन दिले होते. तर, मनोहर जोशी हे मुख्यमंत्री असताना शहराची लोकसंख्या चार लाखांच्यावर गेल्यावर डोंबिवलीची महापालिका होऊ शकेल, असे सांगितले होते. पण, त्याचा विसर पडल्याचा मुद्दाही मान्यवरांनी मांडला.

Web Title: Dombivli Municipal Corporation; The attention of the dignitaries, the dignitaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.