मे महिन्यापर्यंत डोंबिवलीत पाइप गॅस?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 03:07 AM2019-01-10T03:07:24+5:302019-01-10T03:07:48+5:30

केडीएमसीची परवानगी : कामाला सुरुवात

Dombivli pipes gas for May month? | मे महिन्यापर्यंत डोंबिवलीत पाइप गॅस?

मे महिन्यापर्यंत डोंबिवलीत पाइप गॅस?

Next

डोंबिवली : डोंबिवली परिसरात पाइप गॅस पुरवला जाणार असून नागरिकांची अनेक वर्षे प्रलंबित मागणी लवकरच मार्गी लागणार आहे. संथगतीने सुरू असलेल्या या प्रकल्पाच्या कामाला केडीएमसीने तांत्रिक परवानगी दिल्याने गती मिळणार आहे. मे महिन्यापर्यंत शहरातील बहुतांश भागात पाइप गॅसचा पुरवठा सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या सुविधेमुळे गॅस सिलिंडरच्या काळ्या बाजारातील विक्रीला आळा बसणार आहे.

पाइप गॅसच्या सुविधेसाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केला. त्यानुसार, आतापर्यंत एमआयडीसी परिसरात काही ठिकाणी नागरिकांना लाभ मिळत आहे. पण, मध्यंतरी शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण झाले, त्यामुळे त्यानंतर पुन्हा तातडीने खोदकामाची परवानगी महानगर गॅसला महापालिकेने नाकारली. त्यामुळे काही महिने काम संथगतीने पुढे गेले. त्यानुसार, पुन्हा विविध पातळ्यांवरून त्यांना परवानगी मिळण्यासाठी प्रयत्न झाले. त्या खोदकामासाठी महानगरच्या प्रशासनाने महापालिकेला निधीही दिला होता. पण, तरीही परवानगीला विलंब झाला होता. महापालिकेने परवानगी दिल्याने ही अडचण दूर झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार, आता शहरातील ठाकुर्ली परिसरातील पंचायत बावडी, सारस्वत कॉलनीच्या काही भागांत खोदकाम करायला सुरुवात झाली आहे. आगामी काळात मुख्य भागामध्ये ती लाइन टाकण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मे अखेरीस शहरातील बहुतांश भागात पाइप गॅसचा पुरवठा सुरू होणार आहे.

मग परवानगी का रोखली?
च्महानगर गॅस खोदकामासाठी पालिकेकडे विशिष्ट निधी वर्ग करतो. त्याची आकडेवारी कोट्यवधींमध्ये असते. पण, तरीही महापालिकेने परवानगी का रोखून धरली, असा प्रश्न विचारला जात आहे.
च्तसेच ‘महानगर’ने जो निधी दिलेला असतो, तो खोदकाम झाल्यावर पुन्हा रस्तेदुरुस्ती अथवा पॅचकाम करण्यासाठीच वापरला जातो का, असा सवालही जाणकरांनी
उपस्थित केला.
 

Web Title: Dombivli pipes gas for May month?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.