थालासेमिया रक्तविकार जागरूकता अभियानासाठी डोंबिवली प्राईड रन मॅरेथॉन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 01:12 PM2018-02-07T13:12:48+5:302018-02-07T13:16:14+5:30

रोटरी इंटरनॅशनलच्या अधिपत्याखाली आमच्यासारख्या हजारो रोटरी क्लब्जनी मिळून गेल्या काही वर्षात देशातून पोलिओसारख्या मानवाला हतबल करणा-या विकाराला हद्दपार करण्यात यश मिळवले. आता यापुढे काही नागरिकांच्या गुणसूत्रातील जन्मजात वैग्यूण्यामुळे आनुवंशिकतेतून पुढे जाणा-या थालासिमिया या रक्तविकाराला आटोक्यात आणण्याचा चंग रोटरी परिवाराने बांधला आहे. त्याच उद्दीष्टाने रविवारी, ४ मार्च रोजी डोंबिवलीत या रोटरी क्लब आॅफ डोंबिवली वेस्ट या संस्थेच्या माध्यमाने रन फॉर थालासेमिया प्रीव्हेंशन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

Dombivli Pride Run Marathon for Thalassemia Blood Disease Awareness Campaign | थालासेमिया रक्तविकार जागरूकता अभियानासाठी डोंबिवली प्राईड रन मॅरेथॉन

थालासिमिया जागरूकता अभियानासाठी डोंबिवली प्राईड रन मॅरेथॉन

Next
ठळक मुद्देरोटरी क्लब आॅफ डोंबिवली वेस्टचा उपक्रम   ४ मार्च, रविवारी होणार मॅरेथॉन 

डोंबिवली:  रोटरी इंटरनॅशनलच्या अधिपत्याखाली आमच्यासारख्या हजारो रोटरी क्लब्जनी मिळून गेल्या काही वर्षात देशातून पोलिओसारख्या मानवाला हतबल करणा-या विकाराला हद्दपार करण्यात यश मिळवले. आता यापुढे काही नागरिकांच्या गुणसूत्रातील जन्मजात वैग्यूण्यामुळे आनुवंशिकतेतून पुढे जाणा-या थालासिमिया या रक्तविकाराला आटोक्यात आणण्याचा चंग रोटरी परिवाराने बांधला आहे. त्याच उद्दीष्टाने रविवारी, ४ मार्च रोजी डोंबिवलीत या रोटरी क्लब आॅफ डोंबिवली वेस्ट या संस्थेच्या माध्यमाने रन फॉर थालासेमिया प्रीव्हेंशन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

ही मोहीम यंदाचा थ्रस्ट एरिया असल्याचं रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांनी ठिकठिकाणच्या उपक्रमांमध्ये स्पष्ट केले आहे. थालासिमिया वेगवेगळ्या पातळ्यांवर या विकाराबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि बाधित रुग्णाला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक दिलासा देणे हे आमचे उद्दीष्ट असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष दीपक काळे यांनी दिली. काही वर्षांच्या कालावधीत थालासिमिया या विकाराचं समूळ उच्चाटन करण्यासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृतीची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. ही मॅरेथॉन ४ मार्च, रविवारी सकाळी ६.३० वाजता, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे ह.भ.प. सावळाराम म्हात्रे क्रिडा संकूल येथून संपन्न होणार आहे. ५ कि.मी. व १० कि.मी. अशा दोन स्तरावर ही मॅरेथॉन असणार आहे.

४ मार्च रोजी रविवारी होणा-या मॅरेथॉनसाठी आॅनलाईन अर्ज देखिल भरता येणार असून कल्याण-डोंबिवलीतील  इच्छूकांनी www.runburn.in/dpr-2018.html या संकेत स्थळावर, तसेच जगदीश सिक्यूरिटीज, घनश्याम कॉम्प्लेक्स, गाळा क्रमांक२ए/३ डी वींग, सुभाष रोड, डोंबिवली पश्चिम, तसेच  गाळा क्रमांक ४, डेन एनबीसी, विश्वनाथ दरहन, आयरे रोड, एस.के.पाटील रोड, डोंबिवली पूर्व येथे संपर्क साधावा. हा उपक्रम यशस्वी होण्याच्या दृष्टीने 15 फेब्रुवारी पर्यन्त इच्छुकांना अर्ज भरण्याची संधी असेल, संस्थेला सहकार्य करावे असे आवाहन काळे, देवेंद्र माने, विश्ववनाथ ऐय्यर, दिलीप भगत, धनंजय शेट्टीगर, मंदार कुलकर्णी आदींनी केले.

Web Title: Dombivli Pride Run Marathon for Thalassemia Blood Disease Awareness Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.