डोंबिवली-पुणे बससाठी पक्ष सरसावले

By Admin | Published: May 9, 2017 01:05 AM2017-05-09T01:05:58+5:302017-05-09T01:05:58+5:30

प्रवाशांची मागणी असूनही डोंबिवली-पुणेदरम्यान शिवनेरी, व्होल्व्होसारखी सेवा देण्याकडे एसटीचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा

Dombivli-Pune is the party for the bus | डोंबिवली-पुणे बससाठी पक्ष सरसावले

डोंबिवली-पुणे बससाठी पक्ष सरसावले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : प्रवाशांची मागणी असूनही डोंबिवली-पुणेदरम्यान शिवनेरी, व्होल्व्होसारखी सेवा देण्याकडे एसटीचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा मुद्दा मांडत एकंदरीतच एसटी स्टॅण्डच्या दुरवस्थेवर ‘लोकमत’ने बोट ठेवताच डोंबिवलीतील राजकीय पक्ष प्रवाशांच्या बाजूने उभे ठाकले आहेत. आपल्याच पक्षाकडे परिवहन खाते असल्याने शिवसेनेच्या नेत्यांनी तातडीने हा प्रश्न हाती घेत मंगळवारी एसटी स्टॅण्डची पाहणी करण्याचा निर्णय घेतला, तर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही हा प्रश्न सोडवण्यात लक्ष घालणार असल्याचे स्पष्ट केले.
‘लोकमत’च्या हॅलो ठाणे पुरवणीत ‘रिपोर्टर आॅन दी स्पॉट’ या मालिकेअंतर्गत बस स्थानकाच्ंया दुरवस्थेवर प्रकाश टाकणारे सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले. त्यातच डोंबिवली-पुणे ही बससेवा सुरु करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात असूनही तिला एसटीकडून वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात असल्याचा मुद्दाही समोर आला. त्याची गंभीर दखल वेगवेगळ््या राजकीय पक्षांनी घेतली. शिवसेना, मनसेसह काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करुन ही मागणी लावून धरण्यात येईल, असे जाहीर केले.
डोंबिवली-पुणे बस सेवेसाठी परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख भाऊ चौधरी यांनी दिली.
एसटीतर्फे दर पंधरा मिनिटांनी दादर-पुणे, तर दर अर्ध्या तासाने ठाणे-पुणे बस चालवली जाते. त्याच धर्तीवर डोंबिवली-पुणे बससेवा सुरु करण्याची मागणी करण्यात येणार आहे. डोंबिवली बस स्थानक रेल्वे स्टेशनपासून लांब आहे. त्यामुळे डोंबिवली पश्चिमेतील बस प्रवाशांना छोट्या प्रवासासाठीही निवासी भागात बस पकडण्यास जावे लागते. बस स्थानकात येणाऱ्या बसेस पूर्व भागात स्टेशन परिसरातील इंदिरा गांधी चौक अथवा बाजीप्रभू चौकात आल्यास त्या प्रवाशांचा, तसेच शहरात राहणाऱ्या प्रवाशांचा फेरा वाचेल, याकडे शिवसेना लक्ष वेधणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले.
मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी प्रवाशांची मागणी ‘लोकमत’ने उचलून धरल्याचे सांगितले. खाजगी बसेस डोंबिवली-पुणे प्रवासात बक्कळ पैसा कमावतात. पण एसटीने येथे बससेवा सुरु केल्यास प्रवाशांना सुरक्षित आणि ठरलेल्या भाड्यात प्रवास करता येईल. त्यासाठी मनसे पत्रव्यवहार करणार आहे. डोंबिवली बस डेपो सुसज्ज करण्यासाठीही मनसे पाठपुरावा करेल. परिवहन व पालकमंत्री शिवसेनेचे आहेत. त्यांनी या प्रकरणी लक्ष घालून प्रवाशांच्या मागणीची पूर्तता करावी, असा आग्रह कदम यांनी धरला.
डोंबिवलीतील अनेक तरुण कामानिमित्त पुण्यात कार्यरत आहेत. त्यांचे पालक मुंबईत जॉब करतात. त्यामुळे ते डोंबिवलीत राहतात. डोंबिवली-पुणे बससेवा सुरु झाल्यास पालकांना त्यांच्या मुलांना सुट्टीच्या दिवशी भेटण्यासाठी बसने जाता येईल. तर मुलांनाही पुण्याहून डोंबिवलीला बसने येऊन पालकांची भेट घेता येईल, याकडे मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी लक्ष वेधले. डोंबिवलीतील काही मंडळीचे सेकंड होम पुण्याला आहे, तर काही निवृत्तीनंतर पुण्याला राहण्यास गेले आहेत, त्यांनाही ही बस सोयीची आहे.

Web Title: Dombivli-Pune is the party for the bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.