वाहतूक पोलीस हतबल : इंदिरा गांधी चौकात सहावा अनधिकृत स्टँड?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 08:46 AM2018-10-27T08:46:19+5:302018-10-27T08:47:03+5:30

इंदिरा गांधी चौकामध्ये नव्याने सहावा अनधिकृत रिक्षा स्टँड होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या उपविभागीय इमारतीसमोरच्या कैलासचंद्र मेहता मार्गालगत हा स्टँड तयार होत असून त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

dombivli : Sixth unauthorized stand at Indira Gandhi Chowk? | वाहतूक पोलीस हतबल : इंदिरा गांधी चौकात सहावा अनधिकृत स्टँड?

वाहतूक पोलीस हतबल : इंदिरा गांधी चौकात सहावा अनधिकृत स्टँड?

Next

डोंबिवली - इंदिरा गांधी चौकामध्ये नव्याने सहावा अनधिकृत रिक्षा स्टँड होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या उपविभागीय इमारतीसमोरच्या कैलासचंद्र मेहता मार्गालगत हा स्टँड तयार होत असून त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यासंदर्भात स्थानिकांनी वाहतूक पोलिस कर्मचा-यांना सूचित करूनही त्यांनी हतबलता दर्शवल्याने नागरिकांमध्ये पोलिसांच्या अकार्यक्षमतेबद्दल नाराजीचे वातावरण आहे. या चौकात टाटा लेन, कल्याण, गांधीनगर-पीअँडटी कॉलनी, एमआयडीसी, तसेच शहरातील अन्य भागात जाणारे स्टँड असतांनाच आता शनिमंदिर, मानपाडा, स्टार कॉलनी आदी भागात जाण्यासाठीचा स्वतंत्र स्टँड वाहतूक पोलिसांच्या डोळयांदेखतच रिक्षा एकामागोमाग एक उभ्या करण्यात येत आहेत.

पाटकर रोड वगळता या ठिकाणी असलेले स्टँड हे अनधिकृत असल्याचा अहवाल वाहतूक विभाग, आरटीओ, महापालिका या तिन्ही संस्थांच्या पाहणी अहवालातच स्पष्ट झाले होते. त्यात आता आणखी एक स्टँड नागरिकांच्या गैरसोयीत भर घालत आहे. एसटी महामंडळाच्या पनवेल बस स्टँडनजीक या रिक्षा उभ्या असतात. सध्या एका वेळी सात, आठ रिक्षा उभ्या रहात असल्या तरी गर्दीच्या वेळेत या रिक्षा चौकातील वाहतूक कोंडीमध्ये भर घालतात. त्यामुळे शहराचे वाहतूक नियोजन सपशेल कोलमडते. त्यातच महापालिकेसमोरील जागेत उभ्या असलेल्या दुचाकींवर वाहतूक नियंत्रण विभागाच्या टोर्इंग व्हॅन चालकांची मेहेरनजर असल्याने तेथील दुचाकींवर कारवाई होत नसल्याची टीका उघडपणे होत आहे.

एकीकडे गुरूवारी दिवससभरात ११० बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली जाते, पण पोलिसांच्या डोळयादेखतच होणा-या गैरसोयीवर मात्र त्या विभागाचा अंकुश नसल्याची टीका नागरिकांमधून उघडपणे केली जात आहे. या सर्व अनागोंदी कारभारामुळे या ठिकाणी इंदिरा गांधी चौक नको तर रिक्षा चौक असे त्या चौकाचे नामकरण करण्याची उपहासात्मक टीका वास्तूविशारद अलंकार तायशेटे, स्रेहा तायशेटे यांनी केली. वाहतूक नियमाप्रमाणे लेन ची शिस्त दाखवा अन् बक्षिस मिळवा अशी विदारक स्थिती या ठिकाणी आहे. वाहतूक पोलिसांच्या डोळयादेखत हे सगळे होत असल्याचे शल्य आहे. यासंदर्भात इंदिरा गांधी चौकामधील वॉर्डन, वाहतूक विभागाच्या पोलिस कर्मचा-यांना विचारले असता, आम्ही त्यांना हटकतो, पण ते पुन्हा येवून उभे रहात असल्याचे सांगत हतबलता दर्शवली.
 

Web Title: dombivli : Sixth unauthorized stand at Indira Gandhi Chowk?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.