डोंबिवलीची स्थिती : धोकादायक अन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 06:58 AM2018-05-28T06:58:22+5:302018-05-28T06:58:22+5:30

तुम्ही पनीर खरेदी करायला दुकानात जाता. तेथे ब्रँडेड कंपनीपेक्षा स्वस्त स्थानिक ब्रँडचे पनीर हाती ठेवले जाते. डीप फ्रिजरमध्ये ठेवल्याने त्याचा दगड झालेला असतो. खास बात म्हणजे त्यावर ते कधी पॅक केले आहे, कधीपर्यंत वापरावे लागेल याच्या तारखेचा पत्ता नसतो.

 Dombivli status: Dangerous food | डोंबिवलीची स्थिती : धोकादायक अन्न

डोंबिवलीची स्थिती : धोकादायक अन्न

Next

डोंबिवली - तुम्ही पनीर खरेदी करायला दुकानात जाता. तेथे ब्रँडेड कंपनीपेक्षा स्वस्त स्थानिक ब्रँडचे पनीर हाती ठेवले जाते. डीप फ्रिजरमध्ये ठेवल्याने त्याचा दगड झालेला असतो. खास बात म्हणजे त्यावर ते कधी पॅक केले आहे, कधीपर्यंत वापरावे लागेल याच्या तारखेचा पत्ता नसतो. चौकशी केल्यावर दुकानदार सांगतो, साहेब एकदम ताजं आहे. जर ताजं असेल तर ते दगडाइतकं टणक कसं, याचं उत्तर त्याला देता येत नाही... केवळ पनीरच नव्हे, तर रोजच्या वापरातील अनेक खाद्यपदार्थांबाबत अशीच स्थिती आहे. हे धोकादायक अन्न ठिकठिकाणी सर्रास उपलब्ध आहे. पण त्याची पाहणी करायला यंत्रणांना वेळ नाही.
उन्हाळ््याचे दिवस असल्याने आइस्क्रीम मिक्स, सरबतांच्या पावडरी, पपई घालून केलेला आमरस, बर्फाच्या गोळ््यावर घालण्याचे विविध रस, फालुदाचे तयार मिश्रण यांची चलती आहे. त्यांच्या काही पॅकिंगवर तारखा असतात. पण एक्स्पायरी डेटच छापलेली नसते. ‘हा माल खराब होत नाही,’ असा युक्तिवाद करून विक्रेते मोकळे होतात. त्यातील रंग कोणत्या दर्जाचे आहेत, हेही त्यांच्या गावी नसते.
गल्लोगल्ली फरसाणची दुकाने आहेत. त्यात वेफर्स, चकल्या, तळलेल्या डाळी, स्टिक, चिवड्याचे प्रकार, विविध चवीच्या पावडरी लावलेल्या पट्ट्या-चकत्या, खाकरा, पाणीपुरीच्या पुऱ्या, शेवपुरीच्या पुºया, तळलेल्या नूडल्स असे नाना प्रकार उपलब्ध असतात. पण त्यांच्या पिशव्यांवरही पॅकिंगची तारीख नाही.

ताजे पदार्थही होतात दुर्लक्षित

च्अनेकदा ताजे पदार्थ म्हणून विकल्या जाणाºया पदार्थांत पापडाचे पीठ, ठेपले, इडली-चटणी, खोवलेला नारळ, पुरणपोळ््या, लोणची, पॅकबंद छोट्या कचोºया, सुरळीच्या वड्या, अळूवडी (पात्रा), पॅक केलेले लाडू, ओल्या सारणाच्या करंज्या, मांसाहारी पदार्थांसाठी वाटण, इडली-डोसा-मेदूवड्याचे तयार पीठ विकत मिळते.

च्त्याच्या अर्धा किंवा एक लीटरच्या पिशव्या पॅक करून फ्रिजमध्ये ठेवलेल्या असतात. पण त्यावरही तारीख नसते. घरी नेल्यावर अनेकदा अशी पीठे किंवा वस्तू आंबलेल्या असल्याचे लक्षात येते. दुकानदार ओळÞखीचा असेल तर त्यातील काही वस्तू बदलून दिल्या जातात. अन्यथा त्या नीट साठवल्या नाहीत म्हणून ग्राहकावरच बोलणी खाण्याची वेळ येते.

पिझ्झाचा बेस,
इडली-डोशाचे पीठ
हल्ली चायनीजसाठी वेगवेगळी सॉस, इटालियन पदार्थांसाठी चीजच्या सुट्या वड्या, सॉस, चिली फ्लेक्स, हर्ब, स्प्रेड, पिझ्झाचा बेस, पास्तासाठी सॉस, वेगवेगळ््या आकारातील त्याचे तुकडे, पंजाबी डिशेशसाठी ग्रेव्ही, पनीर, मिसळीच्या रश्श्यासाठी तयार वाटण, पाणीपुरीचे तयार पाणी किंवा ते पाणी तयार करण्याची ओली चटणी-वाटण, भेळेसाठी चटण्या, मॉकटेलसाठी स्प्राइटमध्ये घालून पिण्यासाठी वेगवेगळ््या स्वादाच्या बाटल्या किंवा पाऊच, पेप्सीकोला असे अनेक अन्नपदार्थ मिळतात. पण त्यांनाही पॅक केलेल्या तारखांचे वावडे असल्याचे दिसते. पॅकबंद मसाल्यांचीही अशीच स्थिती आहे.

तळलेल्या पदार्थांसाठी पामतेलाचा वापर
तळून तयार केलेले फरसाणचे पदार्थ असोत, पुºया, चकल्या, वेफर्स असोत त्यासाठी पामतेलाचा वापर केला जातो. त्यामुळे ते पदार्थ अधिक काळ पॅकबंद करून ठेवले तरी त्याला वास येत नाही, यासाठी त्याचा वापर सर्वाधिक होतो. हे तेल खाण्यायोग्य असते की नाही, त्या तेलाचा पुन:पुन्हा वापर होतो की नाही, तेही समजत नाही. अनेकदा पदार्थ तळण्याच्या कढया काळ््या रंगाच्या असतात. त्यामुळे तेलाचा बदललेला रंगही समजत नाही. वडे-भजीच्या कोरड्या पिठात अनेकदा सर्रास पिवळा खाद्यरंग, सोडा यांचे आधीच मिश्रण करून ठेवलेले असते.

Web Title:  Dombivli status: Dangerous food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.