डोंबिवलीत कागदविरहीत व्यवस्थापन विषयवार कार्यशाळा संपन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 07:01 PM2018-02-15T19:01:32+5:302018-02-15T19:01:55+5:30
बदलत्या परिस्थितीनुसार अद्ययावत राहणे ही काळाची गरज झाली आहे. शिक्षण क्षेत्र त्यास अपवाद नाही. केवळ ज्ञान व संशोधनापूरते मर्यादित न राहता महाविद्यालयाची कार्यप्रणाली सोपी, सुटसुटीत तसेच पर्यावरणपूर्वक बनवणे अवश्यक आहे.
डोंबिवली - बदलत्या परिस्थितीनुसार अद्ययावत राहणे ही काळाची गरज झाली आहे. शिक्षण क्षेत्र त्यास अपवाद नाही. केवळ ज्ञान व संशोधनापूरते मर्यादित न राहता महाविद्यालयाची कार्यप्रणाली सोपी, सुटसुटीत तसेच पर्यावरणपूर्वक बनवणे अवश्यक आहे. यासाठी युजीसी ने वेळोवेळी निकष सुधारित जरी केले आहेत. या निकषासंदर्भात प्रबोधन व्हावे यासाठी प्रगती महाविद्यालय कार्यलयीन कर्मचाऱ्यांच्या सहयोगाने गुरुवारी एकदिवसीय कागदविरहित कार्यशाळा, कागदपत्रे नियंत्रण आणि दस्तावेज व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
त्याचे उद्धाटन नानावटी महाविद्यालयाच्या कार्यालय प्रमुख केया मुखर्जी यांनी केले. त्यावेळी ठाणे जिल्हा आगरी शिक्षण प्रसारक।मंडळाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील, उपाध्यक्षा पुष्पलता पाटील, सहसचिव दत्ता वझे, कॉलेजचे प्राचार्य डॉ. अ. महाजन, अविनाश शेंदरे, कार्यशाळेचे समनव्यक गुरुनाथ पाटील आदी उपस्थित होते.
केया मुखर्जी यांनी पेपरलेस ऑफिस हा विषय पॉवर पॉईंट द्वारे समजावून सांगितला. डिजिटल प्रणालीच्या वापरावर मार्गदर्शन करताना त्यांनी कर्मचार्यवरील ताण कसा कमी करता येईल यावर मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रात आरती महाडिक यांनी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनि सेवा पुस्तके कशी भरावित, त्यातील अचूक नोंदी कशा कराव्यात, वेळेवेळी पुस्तके अद्ययावत कशी करावीत यासंदरभात मार्गदर्शन केले. त्या कार्यशाळेसाठी मुबंई विद्यापिठाशी सलग्न असलेल्या 45 महाविद्यालयातील 73 शिक्षकेतर प्रतिनिधी सहभागी झाले होते.