डोंबिवली पश्चिमेला नियबाह्य भाडे आकारणी होतच नाही?- कल्याण आरटीओ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 02:24 PM2018-07-19T14:24:39+5:302018-07-19T14:26:47+5:30
येथील पश्चिमेला नियमबाह्य भाडेवाढ करून प्रवाशांना वेठीस धरणा-या रिक्षाचालकांविरूद्ध कारवाई करण्यासाठी गुरूवारी कल्याण आरटीओचे पथक डोंबिवलीत आले होते. परंतू त्यांच्या हाती काही न लागल्याने रिकाम्या हातीच त्या पथकाला जावे लागले. त्यानंतर अधिका-यांनी शहरात अन्यत्र केलेल्या कारवाईमध्ये ४० रिक्षाचालकांवर दंडात्मक तसेच ४ रिक्षा जमा करण्यात आल्या.
डोंबिवली: येथील पश्चिमेला नियमबाह्य भाडेवाढ करून प्रवाशांना वेठीस धरणा-या रिक्षाचालकांविरूद्ध कारवाई करण्यासाठी गुरूवारी कल्याण आरटीओचे पथक डोंबिवलीत आले होते. परंतू त्यांच्या हाती काही न लागल्याने रिकाम्या हातीच त्या पथकाला जावे लागले. त्यानंतर अधिका-यांनी शहरात अन्यत्र केलेल्या कारवाईमध्ये ४० रिक्षाचालकांवर दंडात्मक तसेच ४ रिक्षा जमा करण्यात आल्या.
कल्याण आरटीओ कार्यालयातून प्रविण कोटकर, किरण जाधव या अधिका-यांचे पथक डोंबिवलीत आले होते. भाडेवाढीबद्दल त्यांनी कडक कारवाईसाठी सर्वप्रथम पश्चिमेला भेट दिली, तेथे रिक्षा चालकांची चौकशी केली, बोर्ड कुठे आहेत याची स्टँडवर पाहणी केली, तसेच काही प्रवाशांशी चर्चा केली, परंतू ८ रूपयेच आकारण्यात येत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे नियबाह्य भाडेवाढ संदर्भात कोणी न मिळाल्याने त्यासाठी कोणावर कारवाई करायची असा सवाल कोटकर यांनी लोकमतशी बोलतांना केला. तसेच त्यासंदर्भातील पाहणी झाल्यावर नियमांचे उल्लंघन करणा-या ४० रिक्षाचालकांव कारवाई करण्यात आली, तर ४ रिक्षा कागदपत्रांअभावे आणि अन्य कारणांमुळे जमा करण्यात आल्याचे कोतकर म्हणाले. त्यावेळी त्यांच्यासमवेत डोंबिवली वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलिस अधिकारीही उपस्थित होते.