डोंबिवलीतील युवकाचा लोकलमधून पडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 05:59 PM2018-04-11T17:59:26+5:302018-04-11T17:59:26+5:30

लोकलच्या गर्दीमुळे आणखी एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना डोंबिवली-कोपर स्थानकादरम्यान बुधवारी सकाळी ८.४० च्या सुमारास घडली. रजनीश प्रमोद सिंग (वय ३०) असे त्या युवकाचे नाव असून तो शलाका अपार्टमेंट, गांधीनगर डोंबिवली पूर्व, येथे कुटुंबासमवेत वास्तव्याला होता.

Dombivli's youth falls into a local and dies | डोंबिवलीतील युवकाचा लोकलमधून पडून मृत्यू

डोंबिवलीतील युवकाचा लोकलमधून पडून मृत्यू

Next

डोंबिवली : लोकलच्या गर्दीमुळे आणखी एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना डोंबिवली-कोपर स्थानकादरम्यान बुधवारी सकाळी ८.४० च्या सुमारास घडली. रजनीश प्रमोद सिंग (वय ३०) असे त्या युवकाचे नाव असून तो शलाका अपार्टमेंट, गांधीनगर डोंबिवली पूर्व, येथे कुटुंबासमवेत वास्तव्याला होता. तो डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान जलद मार्गाने मुंबईच्या दिशेने धावणा-या लोकलमधून प्रवास करत असतांना गर्दीमुळे तोल जावून लोकलमधून खाली पडला. परेल येथे एका खासगी कंपनीत तो व्यवस्थापक म्हणून काम करत होता.
कल्याण- सीएसटी लोकल डोंबिवली रेल्वे स्थानकात जलद मार्गावर ८.४० मिनिटांनी फलाट क्रमांक ५ वर आली. त्या लोकलमध्ये रजनीश चढला. लोकलमध्ये खूप गर्दी असल्याने रजनीशला आत प्रवेश करता आला नाही. त्यामुळे लोकलच्या दरवाज्याला लटकून त्याचा प्रवास सुरु होता. मात्र प्रचंड गर्दीच्या रेटयामुळे रजनीशचा तोल गेला आणि तो लोकलमधून खाली पडला. त्याचा अपघात झाल्याचे समजताच सहप्रवाशांनी डोंबिवली लोहमार्ग पोलिसांना कळविले. त्यानुसार पोलीसांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली असता त्याचा मृत्यू झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक गौरीप्रसाद हिरेमठ यांनी दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात त्याच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत रजनीशच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. यापूर्वी भावेश नकाते आणि धनश्री गोडवे आणि आता रजनीश या तिघाही डोंबिवलीकरांचा लोकलच्या गर्दीमुळे अपघाती मृत्यू झाले आहेत.

Web Title: Dombivli's youth falls into a local and dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.