डोंबिवलीत न्यायालयाचा अवमान? ‘नो हॉकर्स’मध्ये पुन्हा अतिक्रमण : फेरीवालाविरोधी कारवाई थंडावल्याचे चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 01:48 AM2017-11-15T01:48:40+5:302017-11-15T01:48:57+5:30

सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अधिकारी आणि कर्मचारी प्रभावीपणे फेरीवाल्यांविरोधात कारवाई करत असल्याचा दावा करत केडीएमसीचे आयुक्त पी. वेलरासू यांनी त्यांचे कौतुक केले.

 Dombivlit Court contempt? Again encroachment in 'No Hawkers': Picture of thawing against anti-hawkers | डोंबिवलीत न्यायालयाचा अवमान? ‘नो हॉकर्स’मध्ये पुन्हा अतिक्रमण : फेरीवालाविरोधी कारवाई थंडावल्याचे चित्र

डोंबिवलीत न्यायालयाचा अवमान? ‘नो हॉकर्स’मध्ये पुन्हा अतिक्रमण : फेरीवालाविरोधी कारवाई थंडावल्याचे चित्र

googlenewsNext

डोंबिवली : सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अधिकारी आणि कर्मचारी प्रभावीपणे फेरीवाल्यांविरोधात कारवाई करत असल्याचा दावा करत केडीएमसीचे आयुक्त पी. वेलरासू यांनी त्यांचे कौतुक केले. प्रत्यक्षात मात्र प्रशासनाची कारवाई थंडावली आहे. रेल्वे स्थानकापासून १५० मीटर परिसरता व्यवसाय करण्यास मनाई असतानाही अतिक्रमण करत फेरीवाल्यांनी न्यायालयाचाही अवमान केल्याचे चित्र डोंबिवलीत सध्या दिसत आहे. रेल्वेच्या पादचारी पुलाला लागून असलेल्या स्कायवॉकवर रात्री सर्रासपणे फेरीवाले ठाण मांडतात. त्यामुळे एकंदरीतच दिखावा ठरत असलेली कारवाई पाहता ‘नव्याचे नऊ दिवस’ याची प्रचिती आल्यावाचून राहत नाही.
एल्फिन्स्टनच्या दुर्घटनेनंतर मनसेने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे सर्वत्र फेरीवाल्यांविरोधात जोमाने कारवाई सुरू झाली. केडीएमसीनेही रेल्वेस्थानक परिसर फेरीवालामुक्त करण्यासाठी अधिकारी व कर्मचाºयांची विशेष पथके नेमून दिवस-रात्र कारवाईला प्रारंभ केला. प्रारंभी ही कारवाई प्रभावीपणे दिसली, मात्र आता कुठेतरी ही कारवाई थंडावत असल्याचे दिसत आहे. कारवाईसाठी जाणारे पथक हे एकाच जागी ताटकळत उभे राहत असल्याने डोंबिवली रेल्वेस्थानकानजीकच्या काही छोट्या गल्ल्यांमध्ये फेरीवाल्यांचे व्यवसाय बिनदिककतपणे सुरू झाले आहेत. पथके कारवाईसाठी येताच फेरीवाले मात्र सामान लपवून त्याच जागी उभे राहत असल्याचे चित्रही पहावयास मिळत आहे. प्रारंभी कारवाई सुरू झाली तेव्हा नुसती कारवाई करू नका, पुनवर्सनाचेही बघा, अशी मागणी फेरीवाला संघटनांनी केडीएमसीकडे केली होती. तसेच १५० मीटरच्या बाहेरही कारवाई करून केडीएमसी न्यायालयाचा अवमान करत असल्याचा आरोपही संघटनांच्या नेत्यांनी केला होता. आयुक्त पी. वेलरासू यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत फेरीवाल्यांविरोधातील १५० मीटर परिसरातील कारवाई सुरूच राहील, असे वेलरासू यांनी स्पष्ट केले होते. परंतु, पथकातील अधिकारी आणि कर्मचाºयांच्या कृपाशीर्वादाने पुन्हा फेरीवाल्यांनी तेथे ठाण मांडून एकप्रकारे न्यायालयाचाही अवमान केला आहे.
उर्सेकरवाडीतील मधुबन सिनेमासमोरचा भाग काहीप्रमाणात सकाळी मोकळा दिसत असलातरी तेथे फेरीवालाविरोधी पथकाचे वाहन आणि दुचाकींचे पार्किंग होत आहे. परंतु, आजुबाजुच्या गल्ल्यांमध्ये मात्र फेरीवाल्यांचे ठेले पुन्हा सुरू झाले आहेत. स्थानकाबाहेरील राथ रोड, नेहरू रोडलगतच्या बाजारपेठेत सकाळी फेरीवाले बसले होते.
कल्याणमध्येही
्नेरस्ते बळकावले-
फेरीवाल्यांवर कारवाईसाठी सकाळी ६ ते दुपारी ३ आणि दुपारी ३ रात्री मध्यरात्री १२ पर्यंत या दोन सत्रांत केडीएमसीने अधिकारी आणि कर्मचाºयांची पथके तैनात होती. परंतु, सकाळी आणि सायंकाळचा काही कालावधी पुरतीच ही कारवाई मर्यादित असल्याचे दिसत आहे.
स्कायवॉकवर रात्री बाजार भरत असल्याने कारवाईसाठी तैनात केलेली पथकेही कुचकामी ठरली आहेत. डोंबिवलीला पुन्हा फेरीवाल्यांचे अतिक्रमण दिसू लागले असताना कल्याणची स्थिती ही फारशी वेगळी नाही.

Web Title:  Dombivlit Court contempt? Again encroachment in 'No Hawkers': Picture of thawing against anti-hawkers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.