उल्हासनगर महापालिका अभ्यासिकेला पुस्तके दान; राज असरोडकर यांचे कौतुक
By सदानंद नाईक | Published: May 17, 2023 06:10 PM2023-05-17T18:10:56+5:302023-05-17T18:11:15+5:30
गोरगरीब व गरजू मुलांनी स्पर्धात्मक परीक्षेत पास होऊन अधिकारी पदा पर्यंत जाता यावे म्हणून महापालिकेने दोन मजली डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेला बांधली आहे.
उल्हासनगर : गोरगरीब व गरजू मुलांनी स्पर्धात्मक परीक्षेत पास होऊन अधिकारी पदा पर्यंत जाता यावे म्हणून महापालिकेने दोन मजली डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेला बांधली आहे. या अभ्यासिकेला आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्तब जमीर लेंगरेकर यांच्या उपस्थित कायद्याने वागा संघटनेचे राज असरोडकर यांनी शेकडों पुस्तके अभ्यासिकेला दिली.
उल्हासनगर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे यांनी सत्ताधारी, विरोधक व सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीने, कॅम्प नं-३ परिसरात दोन मजली अद्यावत अभ्यासिका बांधली. शहरातील मुलांना यूपीएससी, एमपीएससी व विविध स्पर्धात्मक परीक्षेला बसता यावे, निवांत व शांत ठिकाणी अभ्यास करता यावे, म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका उभी राहिली. महापालिकेने अभ्यासिकेत विविध पुस्तके उपलब्ध करून देऊन, सुखसुविधा पुरविल्या आहेत. त्यामुळे दररोज शेकडो मुले-मुली अभ्यास करण्यासाठी अभ्यासिकेत येतात. अभ्यासिकेत येणाऱ्या मुलांचे चौफेर वाचन व्हावे म्हणून महापालिका आयुक्त अजीज शेख व जमीर लेंगरेकर यांच्या संकल्पनेतून पुस्तकाचे दान कार्यक्रम राबविला. याउपक्रमाला अनेकांनी प्रतिसाद देत आपल्याकडील पुस्तके अभ्यासिकेला दान दिली. या पुस्तकाचा फायदा मुलांना होत आहे.
महापालिकेच्या अभ्यासिकेत अभ्यास करणारा देशमुख नावाचा मुलगा गेल्या वर्षी यूपीएससी परीक्षेत पास झाला असून त्याने महापालिका अभ्यासिकेचे कौतुक केले. कोरोना काळात कोणतीही शिकवणींवर्ग न लावता, अभ्यासित अभ्यास करून यूपीएससी परीक्षा पास झाल्याचे देशमुख याने सांगितले. बुधवारी दुपारी सामाजिक कार्यकर्ते व कायद्याने वागा संघटनेचे राज असरोडकर यांनी आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त डॉ सुभाष जाधव यांच्या उपस्थित शेकडो पुस्तके डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेला दिली आहे. या पुस्तकाचा लाभ शेकडो मुलांना होणार असल्याची माहिती आयुक्त अजीज शेख यांनी यावेळी दिली.