१० मिनिटांत शरद पवार कसे मांडायचे हे कळत नाही; 'असे' ते एकमेव नेते - जितेंद्र आव्हाड

By अजित मांडके | Published: December 12, 2022 01:14 PM2022-12-12T13:14:03+5:302022-12-12T13:14:26+5:30

आपल्या देशाला वाचवायचा असेल तर हा शिवबाचा महाराष्ट्र शाहू फुले यांचे विचार मांडायला पाहिजे असं आव्हाड म्हणाले.

Don't know how to present Sharad Pawar in 10 minutes;NCP Jitendra Awad | १० मिनिटांत शरद पवार कसे मांडायचे हे कळत नाही; 'असे' ते एकमेव नेते - जितेंद्र आव्हाड

१० मिनिटांत शरद पवार कसे मांडायचे हे कळत नाही; 'असे' ते एकमेव नेते - जितेंद्र आव्हाड

googlenewsNext

ठाणे - अवघ्या १० मिनिटांत शरद पवार कसे मांडायचे हे कळत नाही. महाराष्ट्राची तळ हातावर माहिती असणारा हा एकमेव नेता आहे. चंद्रपूरचे रस्ते तोंड पाठ होते. भंडारा जिल्ह्यातील अधिकारी यांच्या सोबत बैठक झाली पाण्याची त्याची देखील माहिती पवारांना असते. राजकारणात मैत्री राजकारणांपलीकडे असली पाहिजे. कुणीही किती टीका करा त्यावर ते कधीही रिएक्शन देत नाहीत अशा शब्दात राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी पवारांचे कौतुक केले आहे. 

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सुरक्षा दलात पहिल्यांदा महिलांना स्थान मिळाले. महिलांना आरक्षण देणारा कायदा शरद पवारांनी आणला. आंदोलन हा राजकीय जीवनातला भाग आहे. मीदेखील आंदोलन केले नसते तर आज इथं नसतो. पवारांची उघड बाजू घेणारा म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल झाला. आपल्या देशाला वाचवायचा असेल तर हा शिवबाचा महाराष्ट्र शाहू फुले यांचे विचार मांडायला पाहिजे. मग ते सीमा प्रश्न असो ताकतीने पुढे उभे राहिले पाहिजे असं आव्हाड म्हणाले. 

पत्रकारावर गुन्हा दाखल होणं चुकीचं
चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यात शाईफेक करण्यात आली या प्रकरणी पोलिसांनी शाई फेक करणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करत एका पत्रकाराला देखील ताब्यात घेतले. मात्र पत्रकारावर गुन्हा दाखल करणं हे अत्यंत चुकीचं आहे. पत्रकार हा पत्रकारच काम करत असतो. कोणीही जाणूनबुजून करत नाही आणि सरकारने इतक्या छोट्या मनाच असू नये. सरकार मोठ्या मनाचं असलं पाहिजे. कारण तुम्ही सत्ताधारी आहात. तुमच्या विरोधात आंदोलन होणार, विरोधात निवेदन येणार आपल्या विरोधात बोललं जाणार. परंतु सरकारने यावर पाणी सोडून थंड केलं पाहिजे आणि आपण कसे पुढे जायचं हे बघायचं असतं असंही जितेद्र आव्हाडांनी सांगितले. 

जीवावर उधार होऊनच आंदोलन होतात
पत्रकार कुठल्याही गटात नसतात ते आपल काम करत असतात. माझ्या सोबत देखील असेच घडलं ना. जर एका पत्रकाराने महिलेला बाजूला करतानाचा माझा व्हिडिओ काढला नसता तर या विरोधकांनी मला अजून फसवलं असतं आणि ते त्यांचे काम आहे. पोलिसांना टार्गेट करण्याचं काय कारण पोलीस काय करणार त्यामध्ये निष्कारण गरीब पोलिसांना आपण अडचणीत आणून कारवाई करतो. माणुसकीतून विचार केला तर आंदोलन करण्याची पद्धत हीच आहे. आंदोलन हे जीवावर उधार होऊनच केलं जातं. मी स्वतः एका डॉक्टरच्या अंगावर शाई फेकली होती. एका मुख्याध्यापकावर शाई फेकली होती आणि त्यासाठी आपण शरद पवार यांच्या शिव्या देखील खाल्या असल्याचं आव्हाड यांनी सांगितले.

Web Title: Don't know how to present Sharad Pawar in 10 minutes;NCP Jitendra Awad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.