‘माध्यमिक अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नका’ – ललीता दहितुले

By प्रज्ञा म्हात्रे | Published: June 6, 2023 04:41 PM2023-06-06T16:41:07+5:302023-06-06T16:41:19+5:30

ठाणे : संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या अनधिकृत शाळांवर दंडात्मक कारवाई जिल्हा परिषद ठाणे मार्फत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २७ माध्यमिक ...

"Don't take admission in secondary unauthorized schools" - Lalita Dahitule | ‘माध्यमिक अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नका’ – ललीता दहितुले

‘माध्यमिक अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नका’ – ललीता दहितुले

googlenewsNext

ठाणे : संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या अनधिकृत शाळांवर दंडात्मक कारवाई जिल्हा परिषद ठाणे मार्फत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २७ माध्यमिक शाळा अनधिकृत असून १० अनधिकृत शाळा सुरू आहेत व १७ शाळांनी शाळा बंद करण्याबाबतचे हमीपत्र सादर केले आहे. तरी पालकांना सुचित करण्यात येते कि पुढील शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ करिता या अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नये. 

अनधिकृत शाळांची यादी प्रकाशित करण्यामागे हाच उद्देश आहे कि पालकांनी पाल्याचे माध्यमिक शाळेत प्रवेश घेताना अनधिकृत शाळेत प्रवेश करू नये. पालकांनी अधिक माहिती घेऊनच पाल्याचे शाळेत प्रवेश निश्चित करावे – श्रीम.ललीता दहितुले, शिक्षणाधिकारी माध्यमिक 

 अनधिकृत सुरू असलेल्या शाळांची यादी 

1. अल मुनीहाज सेकंडरी हायस्कूल, बेलापूर, नवी मुंबई
2. स्टार इंग्लिश हायस्कुल, ठाणे मनपा क्षेत्र
3. डिवाईन ग्रेस हायस्कुल , वज्रेश्वरी ता.‍ भिवंडी  
4. बी.एस.एस इंग्लिश स्कूल ,गणेशनगर चितळसर, मानपाडा ठाणे
5. श्रीम कावेरीताई पाटीलइंग्लिश मिडीअम स्कूल,कळवा ठाणे
6. आर एन इंग्लिश स्कूल कोन गाव भिवंडी ठाणे
7. फरान इंग्लिश मिडीअम स्कुल,गौरीपाडा, भिवंडी जि.ठाणे
8. ओमकार इंटरनॅशनल स्कुल,चौळे, ता. कल्याण जि.ठाणे
9. नारायणा ई-टेक्नो स्कूल,ढोकाळी गाव, ठाणे (प) ता. जि.ठाणे
10. देविका इंग्लिश मिडीअम स्कूल,रेतीबंदर रोड, मौजे काल्हेर,ता. भिवंडी,जि.ठाणे
  
 शाळा बंद करण्याबाबतचे हमीपत्र सादर केलेल्या अनधिकृत शाळा 

1. सेंट पॉल इंग्लिश सेंकडरी हायस्कुल चिंचपाडा नवी मुंबई मनपा क्षेत्र
2. श्री साई ज्योती सेकंडरी स्कुल, कोपरखैरणे, नवी मुंबई
3. प्रगती विद्यामंदिर अंबरनाथ
4. युनिक इंग्लिश मिडीयम स्कुल, कल्याण
5. होली मारीया कॉन्व्हेन्ट हायस्कुल, ठाणे मनपा क्षेत्र
6. सिम्बॅायसिस कॉन्व्हेंट हायस्कुल ठाणे
7. आतमन ॲकॅडमी ठाणे , ठाणे मनपा क्षेत्र
8. अरुण ज्योत विदयालय ठाणे, ठाणे मनपा क्षेत्र
9. नॅशनल इंग्लिश स्कुल, दापोडे ता.भिवंडी
10. नूर हायस्कूल ॲन्ड ज्यु. कॉलेज,नूर बाग अल्मास कॉलनी रोड कौसा मुंब्रा ठाणे
11. श्रीम. भागीरथी वझे एज्युकेशन व वेल्फेअर ट्रस्ट,मानपाडा गाव डोंबिवली (पु) जि.ठाणे
12. श्री. विद्या ज्योती स्कूल,डावले, ठाणे
13. डायमेशन इंग्लिश स्कूल,सर्व्हे न 60/3 मौजे कौसा,मुंब्रा, जि.ठाणे
14. आदर्श विद्यालय, लोढा हेवन कल्याण
15. पारसिक स्पेशल स्कुल, मिरा भाईंदर ठाणे
16. आरकॉम इग्लिश स्कुल, ठाणे
17. नालंदा हिंदी विद्यालय ठाणे मनपा क्षेत्र

Web Title: "Don't take admission in secondary unauthorized schools" - Lalita Dahitule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.