कोरोनाला हलक्यात नका घेऊ; ५४ दिवसात ३० जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 05:21 PM2022-07-27T17:21:09+5:302022-07-27T17:21:41+5:30
एकीकडे स्वाईन फ्लु वाढत असतांना तोंडाला मास्क लावण्याचे आवाहन केले जात आहे.
ठाणे :
एकीकडे स्वाईन फ्लु वाढत असतांना तोंडाला मास्क लावण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र दुसरीकडे कोरोनाही कमी झाला असे वाटत असतांना मागील ५४ दिवसात कोरोनामुळे ३० जणांचा मृत्यु झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोरोनाला हलक्यात घेऊ नका असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र असे असले तरी नागरीकांच्या तोडांवरील मास्क गायब झाले आहेत, सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढलेली असल्याचे दिसत आहे. मात्र काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. मागील ५४ दिवसात जिल्ह्यात २३ हजार ३९५ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे.
मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली होती. सुरुवातीला बघता बघता हाताच्या बोटावर मोजण्या इतके रुग्णांची संख्या हजारोंच्या घरात पोहोचली होती. तर, आजार नवीन असल्याने सुरुवातील त्यावर उपचार पद्धती माहित नसल्यामुळे डॉक्टरांना देखील उपचार करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. असे असताना, देखील या जराशी डॉक्टर व इतर कर्मचारी अहोरात्र लढा देत होते. तसेच या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी देखील करण्यात आल्याने, या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यात आखी अंशी यश आले होते. त्यात मागील काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असून या आजाराच्या रुग्णांची संख्या देखील १०० च्या आत आली असून मृत्यूची संख्या देखील शून्यावर आली आहे. अशातच कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी होत असून तोंडावरचा मास्क देखील गायब झाल्याचे दिसून येत आहे. असे असले तर, मागील ५४ दिवसात ३० जणांचे कोरोनाने बळी घेतले असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे कोरोना अजून गेले नसून त्याला हलक्यात घेवू नका असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, ठाणे जिल्ह्यात मागील काही महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. त्यामुळे दररोज नव्याने आढळून येणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १०० च्या आत आला असून मृत्यू देखील शून्यावर आले आहे. असे असले तरी, १ जून २०२२ ते २४ जुलै २०२२ या ५४ दिवसाच्या कालावधीत ५ लाख ८८ हजार ३२२ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली असून यामध्ये २३ हजार ३९५ बाधित रुग्ण आढळून आले. तर,५ लाख ६३ हजार ८६१ जणांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहे. असे असले तर, या आजाराने ३० जणांचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे.