नो मास्क... नो एन्ट्री... कोरोनामुळे मास्क न घालणाऱ्यांस रिक्षात प्रवेश बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2020 03:38 PM2020-10-06T15:38:28+5:302020-10-06T15:39:38+5:30
५ हजार रिक्षांवर माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचे स्टीकर, जनजागृतीची सुरुवात केडीएमसीमधून
कल्याण - कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी माझे कुटुंंब-माझी जबाबदारी ही मोहिम कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत राबविली जात आहे. या मोहिमेच्या प्रचारात कोकण रिजन रिक्षा टॅक्सी चालक मालक संघाने सहभाग घेतला आहे. किमान ५ हजार रिक्षांवर या मोहिमेच्या जनजागृतीसाठी स्टीकर लावले जाणार आहे. त्याचा शुभारंभ आज महापालिका मुख्यालयात करण्यात आला. मास्क न घालणाऱ्यास रिक्षात प्रवेश दिला जाणार नाही. याची अंमलबजावणी आजपासून सुरु केली जाणार आहे.
या प्रसंगी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, महापौर विनीता राणो, रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पेणकर आदी मान्यवर उपस्थित होते. माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमे अंतर्गत महापालिका हद्दीत ५ लाख १५ हजार घरांचे सव्रेक्षण करण्यात येणार आाहे. या प्रत्येक घरात जाऊन प्रत्येकीची चौकशी केली जाणार आहेत. कोरोनाचा एकही रुग्ण लपून राहता कामा नये यासाठी हे सर्वेक्षण सुरु आहे. मात्र आजही रस्त्यावर अनलॉकमध्ये नागरीकांची वर्दळ वाढली आहे. नागरीक विना मास्क घराबाहेर पडत आहे. त्यांच्या विरोधात महापालिका व पोलिसांच्या मार्फत दंडात्मक कारवाई करुन लाखो रुपयांचा दंड वसूल केला जात आहे. ही मोहिम अधिक तीव्र करण्यात आली आहे. मात्र कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी रिक्षा चालकांना प्रवासी वाहतूकीची परवानगी दिली असली तरी रिक्षातून केवळ दोनच प्रवासी नेण्यास परवानगी दिली गेली आहे. मात्र मास्क न घालता रिक्षातून प्रवास केला जात आहे. मास्क न घालणा:यास रिक्षात घेतले जाणार नाही अशी माहिती महापालिका आयु्क्त सूर्यवंशी यांनी यावेळी दिली आहे.
रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष पेणकर यांनी सांगितले की, महापालिका हद्दीतील ५ हजार रिक्षांवर माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचे स्टीकर लावण्यात आले असून त्यातून जनजागृती केली जाणार आहे. ५ हजार रिक्षांवर हे स्टीकर लावले जाणार आहे. कल्याण डोंबिवलीतील रिक्षा केवळ महापालिका हद्दीत प्रवासी भाडे भरत नाही. तर ठाणो, नवी मुंबई, पनवेल या भागातील प्रवासी भाडे भरतात. त्यामुळे ही जनजागृती केवळ कल्याण डोंबिवली महापालिकेपूरती मर्यादी न राहता अन्य शहरांसाठीही उपयुक्त ठरणार आहे.