"वंचित बहुजन आघाडीची समविचारी पक्षांसाठी चर्चेची दारे खुली"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 12:17 AM2020-12-14T00:17:59+5:302020-12-14T00:18:08+5:30

पालिका निवडणुकीसाठी घेतली बैठक

The door of discussion is open for like-minded parties of the deprived Bahujan Alliance | "वंचित बहुजन आघाडीची समविचारी पक्षांसाठी चर्चेची दारे खुली"

"वंचित बहुजन आघाडीची समविचारी पक्षांसाठी चर्चेची दारे खुली"

googlenewsNext

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीमुळे मतांचे विभाजन होत असल्याच्या आरोपावर उत्तर देताना निरीक्षक जानू मानकर यांनी स्पष्ट केले की, आगामी पालिका निवडणुकीत समविचारी पक्षांसोबत वंचित आघाडी करेल. त्यामुळे चर्चेची दारे ही उघडी असल्याचे त्यांनी नमूद केले.
नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीने अंबरनाथसाठी मानकर यांची निरीक्षक पदावर नियुक्ती केली आहे. त्यांची नियुक्ती झाल्यावर पहिली बैठक अंबरनाथमध्ये झाली. कार्यकर्त्यांसह झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षाची भूमिका मांडली. पालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ही स्वबळावर सर्व जागा लढविणार आहे. इच्छुक उमेदवारही मोठ्या संख्येने संपर्कात आहेत. 
असे असले तरी समविचारी पक्षांसोबत चर्चा करण्यासाठी आम्ही तयार आहोत. वंचितांना सोबत जो घेऊन जाईल अशा समविचारी पक्षांसाठी चर्चेची दारे उघडी असतील. 
तसेच निवडणूकपूर्व किंवा निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करताना कुणासोबत जाणे योग्य राहील याची चर्चा पक्षश्रेष्ठींकडे केली जाईल. त्यानंतरच हा निर्णय घेतला जाईल.  
निवडणुकीला सामोरे जाताना स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनाही विश्वासात घेतले जाईल, असे ते म्हणाले. 
विधानसभेत मिळालेल्या मतांमध्ये वाढ करण्याच्या अनुषंगाने पालिकेची निवडणूक महत्त्वाची असेल असे ते म्हणाले.

शिवसेनेने काँग्रेसचे विचार स्वीकारले
राज्यात सत्ता स्थापन करताना काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने शिवसेनेचे विचार स्वीकारलेले नाहीत. मात्र राज्यात सत्ता स्थापन करताना स्थिरतेसाठी शिवसेनेने काँग्रेसचे विचार स्वीकारण्याची तयारी ठेवली. 

Web Title: The door of discussion is open for like-minded parties of the deprived Bahujan Alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.