महिला कर्मचाऱ्यांवर डबल ड्युटीचा ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 12:41 AM2020-06-13T00:41:50+5:302020-06-13T00:42:02+5:30

कळवा रुग्णालयात मनुष्यबळाचा अभाव : ३१ जणींना कोरोनाची लागण

Double duty stress on female employees | महिला कर्मचाऱ्यांवर डबल ड्युटीचा ताण

महिला कर्मचाऱ्यांवर डबल ड्युटीचा ताण

Next

ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील ३१ महिला कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असताना आता येथील उर्वरित कर्मचाºयांपैकी निम्म्या कर्मचाºयांना भार्इंदरपाडा येथील विलगीकरण केंद्रात पाठविण्यात आले आहे. त्यामुळे या रुग्णालयात सद्य:स्थितीत काम करणाºया महिला कर्मचाºयांना डबल ड्युटी करण्याची वेळ आली असून त्यांच्या सार्वजनिक सुट्यांसह आठवड्यातील दुसरा व चौथ्या शनिवारच्या सुट्यादेखील बंद केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या कर्मचाºयांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व रुग्णांना जिल्ह्यातच उपचार मिळावे, यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय कोविड रुग्णालय घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयावर रुग्णांचा अधिक ताण येत आहे. त्यातच मागील महिन्यात कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने एका महिला कर्मचाºयाला कोरोनाची लागण झाल्याने तो विभाग काही दिवसांसाठी बंद ठेवावा लागला होता.
दिवसेंदिवस शहरात रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्यामुळे शिवाजी रुग्णालयातदेखील संशयित रुग्णांचे स्वॅब घेण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णालयातील कर्मचाºयांना कोरोनाची लागण होत असल्याची बाब समोर येत आहे. आतापर्यंत या रुग्णालयातील ३१ कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये २९ स्टाफ (निळा पट्टा) व दोन सिस्टर इनचार्ज असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. त्यातही रुग्णालयातील उपलब्ध स्टाफपैकी ३१ जणांची ड्युटी भार्इंदरपाडा येथील विलगीकरण केंद्रात लावण्यात आली आहे. यामुळे रुग्णालयातील महिला कर्मचाºयांच्या मनुष्यबळावर त्याचा परिणाम झाला असून उपलब्ध महिला कर्मचाºयांना डबल शिफ्टमध्ये ड्युट्या करण्याची वेळ आली आहे.

रुग्णालयातील काही महिला कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाली आहे. उर्वरित कर्मचाºयांपैकी काहींना भार्इंदरपाडा येथे विलगीकरण केंद्रात ड्यÞुटी लावण्यात आली आहे. त्यामुळे शिल्लक कर्मचाºयांवर कामाचा ताण येत आहे. यातूनच त्यांना डबल ड्युटी करावी लागत आहे. यासंदर्भात वरिष्ठांना कळविण्यात आले असून कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणीदेखील करण्यात आली आहे.
- भारती देशपांडे, मेट्रन, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, ठामपा

अनेकदा उपाशी राहण्याची येते वेळ
च्पीपीई कीट घालून काम करताना संपूर्ण अंग घामाने भरून जात असून आठ आणि १२ तास उपाशीपोटी काम करावे लागते. त्यातच या कर्मचाºयांना त्यांच्या सार्वजनिक सुट्यांसह आठवड्यातील दुसरा व चौथा शनिवारच्या सुट्यादेखील बंद करण्यात आल्या आहेत.
च्त्यामुळे या कर्मचाºयांचे आरोग्य धोक्यात आले असून महापालिका प्रशासन रुग्णालयातील कर्मचाºयांच्या जीवाशी खेळत तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: Double duty stress on female employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे