कोरोनाच्या रुग्ण संख्येत दुपटीने वाढ; ५०६ रुग्ण सापडले; पाच जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 08:37 PM2021-02-18T20:37:17+5:302021-02-18T20:58:17+5:30
अंबरनाथ शहरात आठ रुग्णांचा शोध लागला असून एकही मृत्यू नाही. या शहरात आता आठ हजार ६७१ बाधितांसह मृतांची संख्या ३१४ आहे. बदलापूरला आठ रुग्ण आज सापडले असून नऊ हजार ६१३ बाधीत आहे.
ठाणे : जिल्ह्यात काही दिवसांपासून 200 ते 250 च्या दरम्यान आढळारे कोरोना रुग्णात आज दुपटीने वाढ झाली. गेल्या २४ तासात ५०६ रूग्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी आढळून आले. तर पाच जणांचा मृत्यू गुरूवारी झाला आहे. जिल्ह्यात आता दोन लाख ५९ हजार १२५ रुग्ण संख्या झाली असून मृत्यू सहा हजार २१९ मृत्यूची नोंद झाली आहे.
ठाणे शहरा २०१ रुग्ण आढळले आहेत. यासह शहरात ६० हजार ६०२ रुग्णांची नोंद झालेली आहे. तर, दोघांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या एक हजार ३७७ झाली. कल्याण - डोंबिवलीत १३२ रुग्ण आढळून आले असून एकाचा मृत्यू आहे. या शहरात आता ६१ हजार ५४४ बाधीत असून एक हजार १८३ मृत्यू झाले आहेत. उल्हासनगरमध्ये ६ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. आता या शहरात ११ हजार ७२० बाधीत नोंदले असून मृत्यू संख्या ३६९ झाली आहे. भिवंडी परिसरात एकही रुग्ण नसून मृत्यूही नाही. येथे आता सहा हजार ७४५ बाधितांची तर, ३५४ मृतांची नोंद कायम आहे. मीरा भाईंदर शहरात २४ रुग्ण सापडले असून एक मृत्यू नाही. या शहरात २६ हजार ६४७ बाधितांसह ८०१ मृतांची संख्या आहे.
अंबरनाथ शहरात आठ रुग्णांचा शोध लागला असून एकही मृत्यू नाही. या शहरात आता आठ हजार ६७१ बाधितांसह मृतांची संख्या ३१४ आहे. बदलापूरला आठ रुग्ण आज सापडले असून नऊ हजार ६१३ बाधीत आहे. येथे एकही मृत्यू न झाल्याने मृत्यूची संख्या १२५ आहे. जिल्ह्यातील गांवपाड्यांमध्ये ३० रुग्णांचा शोध लागला असून मृत्यू नाही. या गांवपाड्यांत आतापर्यंत १९ हजार ३७५ बाधीत झाले असून एकही मृत्यू नाही. त्यामुळे ५९२ मृत्यूची नोंद कायम आहे.