डोंबिवलीत श्रीराम नवमीचा प्रचंड उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2018 10:11 AM2018-03-25T10:11:47+5:302018-03-25T10:11:47+5:30

डोंबिवली येथिल रामनगर भागात असलेल्या पोलीस ठाण्यात, आफळे  राम मंदिरात, तसेच चिपळूणकर क्रॉस रोडवरील मंदिरात, बाजीप्रभू चौकातील रॅम मंदिरात वर्षानुवर्षे श्रीराम नवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

Doublvital Shriram Navami News | डोंबिवलीत श्रीराम नवमीचा प्रचंड उत्साह

डोंबिवलीत श्रीराम नवमीचा प्रचंड उत्साह

googlenewsNext

डोंबिवली - येथिल रामनगर भागात असलेल्या पोलीस ठाण्यात, आफळे  राम मंदिरात, तसेच चिपळूणकर क्रॉस रोडवरील मंदिरात, बाजीप्रभू चौकातील रॅम मंदिरात वर्षानुवर्षे श्रीराम नवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.  श्री हरी स्वामी समर्थ सेवा मंडळ संचालित गोविंदानंद श्रीराम मंदिरात, पारंपरिक पद्धतीने पाळणा हलवून सुंठवडा प्रसाद दिला जातो, राम जन्मला ग सखे राम जन्मला हे पावन भजन देखी आवर्जून म्हंटले जाते, दिवसभर पाळणा दर्शनासाठी ठेवला जातो, या जस जमेल तसं मंडळाचे कै. संस्थापक भालचंद्र (अण्णा) लिमये यांनी श्रीरामाची सेवा करा, नित्योपासना करा हे सांगितले. खर तर त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांनी सांगितल्याप्रमाणे स्वामींचा मठ बांधला.पण त्यासोबतच राम मंदिर असलेच पाहिजे अशीही ठोस भूमिका घेतली आणि अखेरीस धर्मादाय आयुक्तांनीही श्री स्वामी समर्थ सेवा मंडळच राम मंदिराचा सांभाळ करेल असे आदेश पारित केले.
तेव्हापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राम नवमी, हनुमान जयंती यासह गुरुपौर्णिमा, नुकतीच झालेली श्री स्वामी समर्थ जयंती असे हिंदू परंपरेचे अनेक उत्सव, सण या दोन्ही मंडळामध्ये आवर्जून सजरे केले जातात. मंडळाचे 34 वे मंगल वर्ष सुरू आहे. विविध उपक्रम या मंडळात होत असल्याने भक्तांचा ओढा या ठिकाणी दिसून येतो.
विविध मंदिरामध्ये पहाटेपासूनच राम नामाचे महत्व सांगणाऱ्या भजनाचा शुभारंभ झाला आहे. आरंभी वंदीन... या गाण्यामुळे ठिकठिकाणी वातावरण भक्तिमय झाले आहे. विविध उपक्रमामध्ये रामनाप जप, भजन, कीर्तन, राम जन्माचा पाळणा त्यावेळी म्हंटली जाणारी भजन यामधून रामनवमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात करण्याचा प्रयत्न डोंबिवलीकरानी यंदाही केला आहे.

Web Title: Doublvital Shriram Navami News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.