मंदीचा फटका विकासकांना, ५० टक्के गृहविक्री घटली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 12:10 AM2019-10-09T00:10:09+5:302019-10-09T00:10:39+5:30

गुढीपाडव्याच्या तुलनेत यंदा घरांच्या किमती कमी होऊनही बुकिंगमध्ये घसरण झाली आहे.

The downturn hit developers, leaving home sales down 5 percent | मंदीचा फटका विकासकांना, ५० टक्के गृहविक्री घटली

मंदीचा फटका विकासकांना, ५० टक्के गृहविक्री घटली

Next

ठाणे : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुमारे ३०० घरांची बुकिंग झाली होती. त्यानंतर आता वर्ष संपत आले असताना मंदीच्या झळा थोड्या फार प्रमाणात का होईना विकासकांसोबत ग्राहकांनाही बसल्या आहेत. गुढीपाडव्याच्या तुलनेत यंदा घरांच्या किमती कमी होऊनही बुकिंगमध्ये घसरण झाली आहे. मंगळवारी दसऱ्याच्या दिवशी केवळ २०० च्या आसपास बुकिंग झाल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेतही फ्लॅटच्या विक्रीत जवळ जवळ ५० टक्के घट झाली आहे.
दसºयाच्या मुहूर्तावर बिल्डराकंडून आकर्षक घोषणा करण्यात आल्या होत्या. तसेच दरामध्येही बºयापैकी कपात केली. याशिवाय रजिस्ट्रेशन, जीएसटी आदी रक्कमेवरसुद्धा सुट दिली होती. त्यात ठाण्यातील वातावरण चांगले असून सांस्कृतिक शहर म्हणूनही या शहराची ओळख आहे. त्यामुळे इतर शहरांच्या तुलनेत ठाण्यात अधिक पंसती मिळत असल्याची माहिती एमसीएचआयच्या एका सदस्याने दिली. त्यामुळेच ठाण्यात गृह खरेदीचा ट्रेंड मागील काही वर्षांत वाढला होता. परंतु, यंदा मंदीचा फटका विकासकांनाही बसला आहे. सुरुवातीलाच फ्लॅटच्या किमंती पाच ते दहा लाखापर्यंत कमी केल्या होत्या. परंतु, यंदा दसºयाच्या दिवशीदेखील मंदीमुळे ग्राहकांचा उत्साह फारच कमी दिसून आल्याचे एमसीएचआयच्या सदस्यांनी सांगितले. ग्राहकांचे हित जपून विविध योजना विकासकांकडून पुढे आणल्या होत्या. परंतु, तरीदेखील ग्राहकांनी याकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे. दरवर्षी दसºयाच्या मुहूर्तावर नवीन लॉचिंगही होत असते. परंतु, मंदीमुळे तशा प्रकारचे कुठेच लॉचिंगही करण्यात आलेले नाही.

किमती घसरल्याने तब्बल सव्वा दोन कोटींच्या वाहनांची विक्री
एकीकडे मंदीचा बाऊ केला जात असताना दुसरीकडे वाहनांच्या किंमतींमध्ये घसरण झाल्याने ते करण्यासाठी ठाणेकरांची झुंबड झाल्याचे पाहण्यास मिळाले. दसºयाच्या पूर्वसंध्येला जवळपास बाराशे तर दसºयाला अडीचशे गाड्यांची खरेदी झाली असून यामध्ये एक हजार दुचाकी वाहनांचा समावेश आहे. या वाढत्या वाहनांमुळे शहरात वाहतूककोंडी भर पडणार हे मात्र आता निश्चित झाले आहे. यावेळी तब्बल दोन कोटी २० लाख रुपयांची वाहनविक्री झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजला जातो. या दिवशी सोने असो घर किंवा वाहन हे खरेदी केले जाते. त्यातच दसºयाच्या मुहूर्तावर वाहन खरेदी करण्यासाठी नागरिकांनी धाव घेतल्याचे पाहण्यास मिळाले आहे. पूर्वसंध्येला एक हजार १६० वाहनांची खरेदी झाली. यामध्ये ८५४ दुचाकी, ३२ थ्री-व्हीलर आणि ३८४ वाहने चारचाकी आणि इतर प्रकारची आहे.
या वाहनांची किंमत १ कोटी ९७ लाख ५८ हजार ७६२ इतकी आहे. यामध्ये ८ लाख ८५ हजार १७२ रोखीने तर १ कोटी ८६ लाख ३९ हजार ३२३ आॅनलाइन तसेच २ लाख ३४ हजार २६७ इतर पद्धतीने व्यवहार झाला आहे. दसºयाच्या दिवशी २३२ वाहने खरेदी केली गेली असून त्याची किंमत २३ लाख २५ हजार ६६५ इतकी असून हा व्यवहार आॅनलाइन पद्धतीने झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: The downturn hit developers, leaving home sales down 5 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Homeघर