डीपी रस्त्याला अडथळा ठरणारी २३ बांधकामे पाडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:27 AM2021-06-24T04:27:31+5:302021-06-24T04:27:31+5:30
कल्याण : डोंबिवली पश्चिमेतील सुभाषरोड, हनुमान मंदिर ते हेमंत प्रोव्हिजन स्टोअर्सपर्यंतच्या डीपी रस्त्यात अडसर ठरणारी २३ बांधकामे पाडण्याची धडक ...
कल्याण : डोंबिवली पश्चिमेतील सुभाषरोड, हनुमान मंदिर ते हेमंत प्रोव्हिजन स्टोअर्सपर्यंतच्या डीपी रस्त्यात अडसर ठरणारी २३ बांधकामे पाडण्याची धडक कारवाई बुधवारी महापालिकेने केली.
या बांधकामांना कायदेशीर नोटीस देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. बांधकामधारकांनी उच्च न्यायालयात आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. सर्वोच्च न्यायालयाने स्थगन आदेश दिला होता. त्याची मुदत आज संपुष्टात आल्याने महापालिकेने कारवाईचा हातोडा चालविला. महापालिकेच्या कारवाईदरम्यान मनोज म्हात्रे आणि मंदार म्हात्रे या तरुणांनी कारवाईस मज्जाव करण्याचा प्रयत्न केला. विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय साबळे यांनी वेळीच त्याची दखल घेतल्याने पाडकामाची कारवाई महापालिकेस करता आली. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार प्रभाग अधिकारी सुहास गुप्ते यांनी ही कारवाई पोलीस बंदोबस्तात पार पाडली. एक पोकलेन, एक जेसीबी, २० कामगार यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.
फोटो-कल्याण-केडीएमसी कारवाई
--------------------------