समुद्रापार भरारी घेणाऱ्या डाॅ.अभिधा व समिधा या दृष्टीहीन कन्यांचा अत्रे कट्ट्यावर उलगडला प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 04:38 PM2019-08-29T16:38:08+5:302019-08-29T16:40:49+5:30

डाॅ.अभिधा व समिधा या दृष्टीहीन कन्यांनी समुद्रापार भरारी घेऊन सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या जिद्दीची कहाणी अत्रे कट्ट्यावर उगडण्यात आली.

Dr Abidha and Samidha's visually impaired daughters travel across the sea on a cruise ship | समुद्रापार भरारी घेणाऱ्या डाॅ.अभिधा व समिधा या दृष्टीहीन कन्यांचा अत्रे कट्ट्यावर उलगडला प्रवास

समुद्रापार भरारी घेणाऱ्या डाॅ.अभिधा व समिधा या दृष्टीहीन कन्यांचा अत्रे कट्ट्यावर उलगडला प्रवास

Next
ठळक मुद्देडाॅ.अभिधा व समिधा या दृष्टीहीन कन्यांचा उलगडला प्रवास अत्रे कट्ट्यावर मातृदिनानिमित्त 'सलाम तिच्या जिद्दीला'स्नेहलता धुमटकर व तिच्या कष्टाचे चीज करणाऱ्या या मुलींची मुलाखत

ठाणे : लंडनची फेलोशिप मिळालेली भारतातील पहिली दृष्टिहीन महिला आणि महाराष्ट्रातील पहिली अंध व्यक्ती हा मान मिळवणाऱ्या डॉ.अभिधा धुमटकर आणि त्यांना मदत करणाऱ्या त्यांची बहीण समिधा यांची संघर्षमय कहाणी अत्रे कट्ट्यावर उलगडण्यात आली. तसेच, दोन दृष्टीहीन मुली पदरात असताना, जोडीदार अकाली सोडून गेला तरीसुद्धा न डगमगता अतिशय हुशारीने,धैर्याने या दोघींच्या आईने ह्या दोन मुलींना समर्थपणे आयुष्यात उभं केलं. त्यांच्या या जिद्द्दीचा प्रवास हि यावेळी उलगडण्यात आला. 

     अत्रे कट्ट्यावर मातृदिनानिमित्त 'सलाम तिच्या जिद्दीला', डाॅ.अभिधा व समिधा या दृष्टीहीन कन्यांना समुद्रापार भरारी घेण्यासाठी बळ देणारी माता स्नेहलता धुमटकर व तिच्या कष्टाचे चीज करणाऱ्या या मुलींची मुलाखत घेण्यात आली. यावेळी कट्ट्याच्या सुलभा आरोसकर व शुभांगी घाग यांनी या तिघींशी संवाद साधला. डॉ. अभिदा म्हणाल्या, मला पहिल्यापासून भाषेची खूप चांगली समज होती. संस्कृत, मराठी, इंग्रजी यांचं व्याकरण तर अतिशय उत्तम होते. याशिवाय इतिहास शिकवणाऱ्या सिक्वेरा सरांमुळे इतिहासाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच बदलून गेला आणि मी इतिहासाकडे वळली. पुढच्या सगळ्या पदव्या इतिहास विषयातच घेतल्या.1883 सालीसुद्धा विज्ञान प्रदर्शन भरवणारे बाळाजी प्रभाकर मोडक यांची पुस्तकं माझ्या वाचनात आली. सायन्सच्या उपशाखांवर 24 पुस्तके लिहिणाऱ्या मोडकांमुळे History of science in Maharashtra बद्दल उत्सुकता निर्माण झाली आणि माझा पी.एच.डी चा विषय पक्का झाला. हे सगळं शिकत असताना मी संस्कृत, इंग्रजी, सिंधी, बंगाली, उर्दू, इटालियन, पर्शियन, जर्मन,फ्रेंच, अरेबिक ह्या भाषांवरसुद्धा प्रभुत्व मिळवले. मला १४ भाषा ज्ञात आहे. शिवाय कोकणी,मराठी येतातच. एम.ए.,बी.एड.,सेट,नेट पूर्ण झालेलं एम.फील.चालूच होतं. नोकरीसाठी पण प्रयत्न चालू होते. पण अंध म्हणून नकार मिळत होते. मी कधी खूप खचून जायची. पुढे मी घरी संस्कृतच्या ट्यूशन घ्यायला सुरुवात केली. नंतर एका खाजगी क्लासमध्या फ्रेंच शिकवायला सुरुवात केली. ग्रँटरोडपासून अंधेरीपर्यंतच्या त्यांच्या सगळ्या शाखांमध्ये दिवसभर जाऊन मी शिकवत असे. रीडर नसल्यामुळे पी.एच.डी. पूर्ण होईल की नाही ही शंका मला वाटत होती. पण गाईड डॉ. मरीयम डोसल आणि प्रो.जे.व्ही.नाईक यांच्या मार्गदर्शनामुळे मला पी.एच.डी. मिळाली. पुढे 2010 मध्ये साठ्ये कॉलेजमध्ये नोकरीसुद्धा मिळाली. 2014मध्ये इतिहासाच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट पदाची जबाबदारी मी स्वीकारली. इतिहासाने मला विचार करण्याची बुद्धी दिली असे डॉ. अभिडा कौतुकाने सांगतात. समिधा यांनी त्यांच्या मोठ्या बहिणीला  रीडर्स कसे मिळवले याबाबद्दल सांगताना त्या म्हणाल्या कि, श्रीलंका आणि ग्लासगोला कॉन्फरन्ससाठी आमंत्रण तसेच लंडनला चार्ल वॉलेर इंडिया ट्रस्ट तर्फे शॉर्ट टाइम रिसर्च फेलोशिप मिळालं. फेलोशिपसाठी लंडनला जायचं तर इथून रीडर नेण खूपच खर्चिक होणार होतं. त्यामुळे तिथल्या रीडरची गरज होती. अगदी जायच्या दिवसापर्यंत रीडरची सोय झाली नव्हती. पण अनपेक्षितपणे मिळालेल्या मदतीमुळे ते सुकर झालं. लंडनमधील रीडरना मेल पाठवणं,त्यांची नावं,वेळ एक्सेल शीटमध्ये घालणं,सगळ्यांचा व्हॉट्स अॅप गृप करुन त्यांच्या संपर्कात राहाणं आणि ताईची बॅग्ज भरुन देण्यापर्यंतची महत्त्वाची कामं केली. डॉ. आभिधा यांचे 14 रिसर्च पेपर "इकॉनॉमिक अँड पोलिटिकल विकली","इंडियन जनरल हिस्ट्री ऑफ सायन्स","इंडियन कॉग्रेस हिस्ट्री प्रोसिडिंग","इन्स्टिट्यूट ऑफ हिस्ट्रॉरिकल रिसर्च" अशा नावाजलेल्या पेपरमध्ये आणि संस्थांमध्ये वाचले गेले असे यावली सांगण्यात आले. 

Web Title: Dr Abidha and Samidha's visually impaired daughters travel across the sea on a cruise ship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.