डॉ. अब्दुल कलाम लाइफटाइम अचिव्हमेंट नॅशनल अवाॅर्डने नितीन गाढे सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 11:43 PM2021-04-26T23:43:28+5:302021-04-26T23:43:35+5:30
बंगलोर येथील ए.डी.ए. रंगमंदिर सभागृहात एका विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
कर्जत : कर्जत तालुक्यातील मुद्रे बुद्रुक गावातील गुरुकृपा कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च, कल्याण, ठाणे येथे कार्यरत प्राध्यापक. डॉ. नितीन गाढे यांना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोसिअल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, बंगलोर,कर्नाटक येथील नामांकित संस्थेचा मानाचा ‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम लाइफटाइम अचिव्हमेंट नॅशनल अवाॅर्ड’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
बंगलोर येथील ए.डी.ए. रंगमंदिर सभागृहात एका विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात एन. आय. टी. आय. गव्हर्न्मेंट ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. शिवप्पा यांच्या हस्ते डॉ. नितीन गाढे यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी कर्नाटक गव्हर्न्मेंट अधिकारी व अभिनेत्री श्रेया पाटील, अभिनेता विरन केशव, आदी उपस्थित होते .भारतामधून विविध राज्यातील कला, नृत्य, गायन, शिक्षण, सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ४५ सत्कारमूर्तींना यावेळी गौरव करण्यात आला.