डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना अटक करा; अंनिसकडून ठाण्यात समाज जागर फेरी
By सुरेश लोखंडे | Updated: August 20, 2023 17:26 IST2023-08-20T17:25:33+5:302023-08-20T17:26:15+5:30
येथील अंनिसच्या कार्यकर्त्यांनी ठाणे शहर शाखेच्या नेतृत्वाखाली आज या जागर फेरीचे आयोजन केले.

डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना अटक करा; अंनिसकडून ठाण्यात समाज जागर फेरी
ठाणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे (अंनिस.) संस्थापक डॉ. नरेन्द्र दाभोलकर यांच्या निर्घृण हत्येच्या घटनेला आज १० वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु डॉक्टरांचे मारेकरी, सूत्रधारांना पकडण्यात पोलीस वा सरकारी यंत्रणांना अद्याप यश आलेले नाही. त्याचा निषेध करून अंनिसच्या कार्यकर्त्यांनी आज ठाणे शहरात जागर फेरी काढून प्रशासनाचे लक्ष वेधले आणि मारेकारांन लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाईची मागणी केली.
येथील अंनिसच्या कार्यकर्त्यांनी ठाणे शहर शाखेच्या नेतृत्वाखाली आज या जागर फेरीचे आयोजन केले. यावेळी डॉ दाभोलकरांच्या मारेकºयांना लवकरात लवकर पकडण्याची मागणी या जागर फेरीव्दारे कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. कार्यकर्त्यांची ही समाज जागर फेरी टेंभी नाका, कोर्ट नाका येथून सुरू झाली. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास कार्यकर्त्यांकडून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर या फेरीला सुरूवात झाली. कार्यकर्त्याची ही फेरीन मराठी ग्रंथसंग्रहालय जवळून पुढे गेली. रेल्वेस्थानक (पश्चिम) येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर, यांच्या पुतळ्याजवळ कार्यकर्त्यांनी ५ ते १०मिनिटांचे निदर्शने केली. मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा येथे या जागर फेरीचा समारोप झाला, असे येथील अंनिसचे जेष्ठ कार्यकर्त्ये अशोक चव्हाण यांनी लोकमतला सांगितले.