डॉ. प्रशांत चौधरी यांना निलंबित करा, स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रेंचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 02:17 AM2017-10-11T02:17:40+5:302017-10-11T02:18:12+5:30

 Dr. Suspending Prashant Chaudhary, chairman of standing committee chairman Ramesh Mhatre | डॉ. प्रशांत चौधरी यांना निलंबित करा, स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रेंचे आदेश

डॉ. प्रशांत चौधरी यांना निलंबित करा, स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रेंचे आदेश

Next

कल्याण : डोंबिवलीतील सर्पमित्र भरत केणे याला सर्पदंश झाल्यावर त्याला उपचारासाठी महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, त्याच्यावर उपचार न करता त्याला पुढील उपचारासाठी अन्य सरकारी रुग्णालयात नेण्याचा सल्ला देत उपचारात हलगर्जी केल्याप्रकरणी डॉ. प्रशांत चौधरी यांना निलंबित करण्याचे आदेश स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी प्रशासनास दिले आहेत.
महापालिकेच्या रुग्णालयांत सामान्य नागरिक उपचासाठी येतात. परंतु, त्यांना योग्य प्रकारे उपचार मिळत नाहीत. त्यांची तपासणी न करताच त्यांना पुढील उपचारासाठी कळवा रुग्णालय किंवा मुंबईत केईएम व जे. जे. रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला जातो. त्याचाच प्रत्यय सर्पमित्र केणे यांना आला. त्यांना उपचारासाठी नेले असता त्यांना उपचार न करता एक तास ताटकळत ठेवले. त्यानंतर पुढील उपचारासाठी अन्यत्र हलविण्याचा सल्ला दिला. वेळीच उपचार न मिळाल्याने केणे याचा मृत्यू झाला. नागरिकांच्या जीवाशी डॉक्टर व नर्स खेळत असल्याने सभापतींनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला.
एका रिक्षा चालकालाही पिसाळलेला कुत्रा चावला होता. त्यालाही रेबिजचे इंजेक्शन असूनही दिले गेले नाही. याबाबत मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता रोडे यांनी काय कारवाई केली. त्यांचा वचक राहिलेला नाही.
रुग्णालयावर वर्षाला कोट्यावधी रुपये खर्च केले जात असतानाही नागरिकांना उपचार मिळत नाही. रुग्णालयात औषधे असूनही रुग्णांना बाहेरून ती घेण्याचा सल्ला दिला जातो. उपचारासाठी आलेल्या रुग्णांची हकालपट्टी करणाºया डॉक्टरांची हकालपट्टी करा, असा आदेश सभापती म्हात्रे यांनी दिला. त्याला नगरसेवक विकास म्हात्रे यांनी दुजोरा दिला. ते स्वत: रुग्णालयात उपाचारासाठी गेले असताना त्यांनाही तसाच अनुभव आला. तेथील नर्सने औषध आहे, पण ते कपाटात कुलूप बंद आहे. त्याची चावी नाही, असे उत्तर म्हात्रे यांना दिले.
रुग्णालयातील औषधे रुग्णांना न देता बाहेर विकली जातात, असा आरोपही सभापतींनी या वेळी केला. सदस्याला अशी वागणूक मिळत असेल तर सामान्य रुग्णांची काय अवस्था असेल, असा प्रश्न अन्य नगरसेवकांनी उपस्थित केला. त्याचबरोबर पालिका रुग्णालयातील गोळीत तार सापडली होती. दरम्यान, या सगळ््या प्रकरणास डॉ. रोडे या देखील तितक्याच जबाबदार असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

Web Title:  Dr. Suspending Prashant Chaudhary, chairman of standing committee chairman Ramesh Mhatre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.