ठाण्यात डॉ. कलाम कल्पकता केंद्र
By admin | Published: January 5, 2017 05:41 AM2017-01-05T05:41:03+5:302017-01-05T05:41:03+5:30
लोकमतने आपल्या काही तरी कर ठाणेकर मोहिमेतंर्गत शहरातील तलावांच्या दुरस्थेवर प्रकाशझोत टाकल्यानंतर प्रशासनाने ती दूर करण्याची पाऊले उचचली
ठाणे : लोकमतने आपल्या काही तरी कर ठाणेकर मोहिमेतंर्गत शहरातील तलावांच्या दुरस्थेवर प्रकाशझोत टाकल्यानंतर प्रशासनाने ती दूर करण्याची पाऊले उचचली.त्यानुसार विद्यार्थ्यांच्या मनात अभ्यासबरोबरच विज्ञानाचीदेखील आवड निर्माण व्हावी या उद्देशाने आता ठाणे महापालिका मुख्यालयासमोरील कचराळी तलाव परिसरातील डॉ. अब्दुल कलाम कल्पकता केंद्राचा शुभारंभ गुरुवारी होत आहे. याठिकाणी विद्यार्थ्यांना रोबोटीक विज्ञानाची माहिती आणि मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
कचराळी तलाव परिसरातील एका खोलीमध्ये कल्पकता केंद्र उभारणीचे काम पूर्ण झाले असून गुरुवारी सांयकाळी ५.३० वाजता महापौर संजय मोरे यांच्या हस्ते या केंद्राचे लोकार्पण केले जाणार आहे. कचराळी तलावाच्या काठापासून जवळच ही खोली असून त्याठिकाणी विज्ञानाच्या प्रयोगांसाठी विशिष्ट आसनव्यवस्था आहे. त्यामुळे तलावाच्या काठावर आता विद्याार्थी विज्ञानाचे धडे गिरवणार आहेत. विज्ञानाची आवड असलेल्या विद्याार्थ्यांना विविध प्रकारचे प्रयोग करण्यासाठी उत्तेजन मिळावे म्हणून कल्पकता केंद्रांची उभारणी केली गेल्याचे सांगण्यात येत आहे. लोकमतने काही तरी कर ठाणेकर या अंतर्गत या तलावाच्या दुरवस्थेबाबत आवाज उठविताच पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सकाळीच घटनास्थळी भेट देऊन येथे सुशोभीकरणासह अन्य पर्याय सुचविले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव तयार करून प्रभाग सुधारणा निधींतर्गत कल्पकता केंद्र उभारणीचे केले आहे. या केंद्राच्या माध्यमातून विद्याार्थ्यांना विनामुल्य प्रशिक्षण दिले जाणार असून त्याठिकाणी त्यांना विविध प्रकारचे प्रयोग करणे शक्य होणार आहे. या केंद्रामध्ये प्रवेश घेण्यासाठी आतापर्यंत १०० विद्याार्थ्यांनी नोंदणी केली आहे. शालेय विद्याार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीमधून विज्ञान आणि तंत्रज्ञान अनुभवता यावे आणि विविध प्रयोग व प्रात्यिक्षकांच्या माध्यमातून त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी, यासाठी डॉ. अब्दुल कलाम कल्पकता केंद्र उभारले आहे. या केंद्रामध्ये पहिली ते दहावीच्या विद्याार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. १५ विद्याार्थ्यांची एक बॅच असणार असून दिवसातून चार बॅच घेतल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे विज्ञानाच्या प्रयोगासाठी महापालिकेकडून साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. या केंद्रामध्ये विज्ञान क्षेत्रात भरीव कामिगरी करणाया शास्त्रज्ञांचे छायाचित्र लावण्यात आले आहेत. या केंद्रामध्ये विद्याार्थ्यांना आठवड्यातून दोन तास विज्ञान, तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, रोबोटिक्स अशा विविध विषयांवरील ३ हजारहून अधिक प्रयोग स्वत:च्या हाताने करण्याची संधी उपलब्ध होणार झाली आहे. (प्रतिनिधी)