वेदमूर्ती डॉ. भीमराव कुलकर्णी यांचे निधन; चारही वेदांचा मराठीत केला होता अनुवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 08:54 PM2021-12-13T20:54:38+5:302021-12-13T20:56:12+5:30

संपूर्ण ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद यांचे त्यांनी मराठीत भाषांतर केले.

Dr. Vedmurti Bhimrao Kulkarni has passed away at the age of 99 today. | वेदमूर्ती डॉ. भीमराव कुलकर्णी यांचे निधन; चारही वेदांचा मराठीत केला होता अनुवाद

वेदमूर्ती डॉ. भीमराव कुलकर्णी यांचे निधन; चारही वेदांचा मराठीत केला होता अनुवाद

Next

डोंबिवली: वेदमूर्ती डॉ. भीमराव सदाशिव कुलकर्णी ज्यांनी चारही वेदांचा मराठीत अनुवाद केला. ७० उपनिषदे यांचेही त्यांनी भाषांतर केले. संस्कृतीचे मोठे देणे समाजपुरुषाला दिले. ते साक्षात वेद स्वरूप, ज्ञानस्वरूप होते. त्यांचे वयाच्या ९९व्या वर्षी, वार्ध्यक्याने सोमवारी निधन झाले. याच वर्षी त्याना त्यांच्या वेदांच्या अभ्यासाबद्दल डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली होती.

संपूर्ण ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद यांचे त्यांनी मराठीत भाषांतर केले. वेद स्वरूप होऊन ते काळाच्या पडद्याआड गेले, अशा शब्दात शुक्ल यजुर्वेदीय माध्य. ब्राह्मण संघाचे अध्यक्ष प्रदीप जोशी गुरुजींसह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Web Title: Dr. Vedmurti Bhimrao Kulkarni has passed away at the age of 99 today.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.