पावसाच्या तोंडावर उल्हासनगरात अखेर नालेसफाईला सुरूवात; १५ जूनपर्यंत नालेसफाई
By सदानंद नाईक | Published: May 24, 2024 06:07 PM2024-05-24T18:07:52+5:302024-05-24T18:08:07+5:30
कॅम्प नं-३ येथील केंब्रीज शोरुम जवळील येथील मोठा नाल्याच्या सफाईला सुरूवात केली
उल्हासनगर : पावसाळा तोंडावर येऊनही नालेसफाईला सुरवात झाली नसल्याने टीकास्त्र सुरू झाल्यावर, महापालिकेने मोठ्या नालेसफाईला शुक्रवार पासून सुरवात केली. १५ जून पर्यंत नाले सफाई सुरू राहणार असून नाल्यातून काढलेला गाळ त्वरित उचलण्याच्या सूचना आयुक्त अजीज शेख यांनी दिली आहे.
उल्हासनगर महापालिका आयुक्त अजिज शेख यांच्या हस्ते जेसीबी मशीनची पूजा करून, मोठ्या ३८ नाल्याची सफाई जेसीबी व पोखलन मशिनद्वारे केली. तर शहर अंतर्गत नाल्याची सफाई कंत्राटी कामगारांद्वारे करण्यात येणार आहे. कॅम्प नं-३ येथील केंब्रीज शोरुम जवळील येथील मोठा नाल्याच्या सफाईला सुरूवात केली. वालधुनी नदी, खेमानी नाला, गुलशननगर नाला, गायकवाड पाडा नाला आदी मोठ्या नाल्याच्या सफाईला सुरवात करण्याचे संकेत दिले.
महापालिका आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमिर लेंगरेकर, उपायुक्त सुभाष जाधव, सहायक सार्वजनिक अधिकारी मनिष हिवरे, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे आदी कर्मचारी नाले सफाई अभियान वेळी उपस्थित होते. तसेच काढलेला गाळ त्वरित उचलण्याचा सूचना आयुक्त यांनीं आरोग्य विभागाला व ठेकेदाराला दिले आहे. १५ जुनपूर्वी नाले स्वच्छ होणार असल्याचे संकेत आयुक्त अजीज शेख यांनी दिलें आहे.