सुके खोबरे महाग तर तेल झाले स्वस्त, भाज्यांचे दर ६० ते ७० टक्क्यांनी घसरले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2020 11:49 PM2020-12-06T23:49:51+5:302020-12-06T23:52:32+5:30

Thane News : दिवाळीपासून तेलाचे दर वाढत होते. प्रत्येक आठवड्यात ५ रुपये वाढत होते. गेल्या आठवड्यात तेल प्रचंड महाग होते. परंतु, या आठवड्याने दिलासा दिला असून तेलाच्या दरात घसरण झाली आहे

Dried coconuts became more expensive and oil became cheaper, while vegetable prices fell by 60 to 70 per cent | सुके खोबरे महाग तर तेल झाले स्वस्त, भाज्यांचे दर ६० ते ७० टक्क्यांनी घसरले

सुके खोबरे महाग तर तेल झाले स्वस्त, भाज्यांचे दर ६० ते ७० टक्क्यांनी घसरले

googlenewsNext

 ठाणे : भाज्यांचे दर ६० ते ७० टक्क्यांनी उतरले असताना दुसरीकडे फळांचे दर मात्र स्थिर आहेत. तर चक्रीवादळामुळे आवक कमी झाल्याने सुके खोबरे महाग झाले असून गेले अनेक दिवस वाढलेल्या तेलात किलोमागे ५ ते ८ रुपयांनी घसरण झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
दिवाळीपासून तेलाचे दर वाढत होते. प्रत्येक आठवड्यात ५ रुपये वाढत होते. गेल्या आठवड्यात तेल प्रचंड महाग होते. परंतु, या आठवड्याने दिलासा दिला असून तेलाच्या दरात घसरण झाली आहे तर दुसरीकडे सुके खोबरे ३० रुपयांनी महाग झाल्याचे विक्रेते रोहित सावला यांनी सांगितले. डाळिंबाचे दर कमी झाले नसून दुसरीकडे द्राक्ष, अंजीर, स्ट्रॉबेरीचा सिझन सुरू झाला आहे. स्ट्रॉबेरीचा दर गगनाला भिडला आहे, असे फळ विक्रेते दीपक गुप्ता यांनी सांगितले.
गेल्या आठवड्यापेक्षा भाज्यांच्या दरात चांगलीच घसरण झाली आहे. होलसेलमध्ये कोथिंबीर जुडी २०० रुपये शेकडा विकली जातेय. शेवग्याच्या शेंगांचे दर मात्र कमी होत नसल्याचे भाजी विक्रेते राकेश अभंग यांनी सांगितले. भाज्यांचे दर कमी झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. पालेभाज्या प्रचंड स्वस्त आहेत. आवक वाढल्याने दर घसरले असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.  

शेवगा ८० रुपये किलाे 
शेवग्याच्या शेंगा किरकोळमध्ये ८० रुपये किलो, तर होलसेलमध्ये ५० ते ६० रुपये किलो आहे. ३०० रु. किलोने विकले जाणारे मटार किरकोळमध्ये ४० रु. किलो तर होलसेलमध्ये  २५ ते २६ रु. किलोने मिळत आहेत.

स्ट्रॉबेरी ५०० रुपये किलाे 
डाळिंबाची आवक कमी असल्याने दर वाढलेले आहेत. किरकोळमध्ये २५० रुपये किलो, तर होलसेध्ये २०० रुपये किलो आहे. द्राक्ष किरकोळमध्ये २०० रुपये किलो, तर होलसेलमध्ये १५० रुपये किलो, अंजिर किरकोळमध्ये १०० रुपये एक डबा तर होलसेलमध्ये ३०० रुपयांचे चार डबे, स्ट्रॉबेरी किरकोळमध्ये रुपये ५०० रु. किलो तर होलसेलमध्ये ४०० रुपये किलोने विक्री सुरू आहे. 

खोबरे महागले
सुके खोबरे १७० रुपये किलोने किरकोळमध्ये विकले जात होते, आता २०० रुपये किलो झाले आहे. होलसेलमध्ये १९० रुपये किलो दर आहे. तेलाचे दर किरकोळमध्ये ११५ ते १५० रुपये प्रति लीटर तर होलसेलमध्ये ११० ते - १४२ रुपये प्रति लीटर आहे. किराणाचे इतर मार्केट मात्र स्थिर आहे. 

दक्षिण भारतातून सुक्या खोबऱ्याची आवक मोठ्या प्रमाणात होते. तेथे चक्रीवादळ आल्याने दर वाढले आहेत. 
    - रोहित सावला, 
    किराणा विक्रेते 

फळांचे दर स्थिर असले, तरी ग्राहक मात्र फारसे नाहीत. डाळिंब महागच आहे. स्ट्रॉबेरीचा सिझन सुरू झाला असला, तरी सध्या खूप महाग आहे. 
    - दीपक गुप्ता, 
    फळ विक्रेते

​​​​​​​सगळ्याच भाज्यांचे भाव खाली आले आहेत. मटार जितका महाग झालेला तितका आता स्वस्त झाला आहे. निम्म्यापेक्षा निम्मे दर भाज्यांचे आहेत. दर कमी झाल्यामुळे ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे.
    - राकेश अभंग, 
    भाजी विक्रेते
 

Web Title: Dried coconuts became more expensive and oil became cheaper, while vegetable prices fell by 60 to 70 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.