अफगाणिस्तानात तणाव वाढल्याने ड्रायफ्रुट्स महागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:42 AM2021-08-22T04:42:22+5:302021-08-22T04:42:22+5:30
ठाणे : अफगाणिस्तानातील तणावग्रस्त वातावरणामुळे अफगाणी ड्रायफ्रुट्स जवळपास ४० टक्क्यांनी महागले आहेत. १५० ते २०० रुपयांनी ड्रायफ्रुट्सचे दर वाढल्याचे ...
ठाणे : अफगाणिस्तानातील तणावग्रस्त वातावरणामुळे अफगाणी ड्रायफ्रुट्स जवळपास ४० टक्क्यांनी महागले आहेत. १५० ते २०० रुपयांनी ड्रायफ्रुट्सचे दर वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले
१) हे पाहा भाव (प्रति किलो)
तणावापूर्वीचे भाव सध्याचे भाव
बदाम ७५० - ११०० ते १२००
पिस्ता ८५०- ९०० ते १००० - १५००
काळे खजूर ३६० ते ४५०
अंजीर १३०० ते १५००
२) सध्या तरी स्टॉक उपलब्ध आहे. अजून तरी स्टॉकवर परिणाम झालेला नाही. भविष्यात मात्र काय होईल, आता सांगू शकत नसल्याचे व्यापारी म्हणाले.
३) सध्याची परिस्थिती पाहता भविष्यात दर पूर्ववत होणे कठीण आहे. भविष्यात आणखीन भाव वाढू शकतो. दरांमधील चढ-उताराबाबत मी ग्राहकांना वेळोवेळी माहिती देत असते आणि सगळीकडे तीच परिस्थिती असल्याने आणि ग्राहकांना याची जाणीव असल्याने ड्रायफ्रुट्सची खरेदी होत आहे.
- अश्विनी वायंगणकर, होलसेल विक्रेत्या
४) ड्रायफ्रुट्सचे दर खूपच वाढले आहेत. त्यामुळे ड्रायफ्रुट्सयुक्त पदार्थांचे दर नाइलाजाने गणेशोत्सवाआधी वाढवावे लागतील. रक्षाबंधन झाल्यानंतर कोणत्या पदार्थांचे किती दर वाढवावे लागतील, हे ठरविले जाईल.
- सिद्धार्थ जोशी, उपाहारगृहाचे मालक