पिण्याचे पाणी, शेतीला गंभीर धोका

By admin | Published: July 5, 2017 06:19 AM2017-07-05T06:19:14+5:302017-07-05T06:19:14+5:30

अंबरनाथच्या चिखलोली धरण परिसरात रासायनिक कचरा टाकल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर आता जीआयपी टँक परिसरातही अशाच प्रकारचा

Drinking water, serious threat to agriculture | पिण्याचे पाणी, शेतीला गंभीर धोका

पिण्याचे पाणी, शेतीला गंभीर धोका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : अंबरनाथच्या चिखलोली धरण परिसरात रासायनिक कचरा टाकल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर आता जीआयपी टँक परिसरातही अशाच प्रकारचा कचरा टाकल्याचे समोर आले आहे. चिखलोली प्रकरणात कारवाई झाल्यावरही कंपन्यांना अजून धाक बसला नसल्याचेच यातून उघड झाले. या भागातील काही कंपन्या रासायनिक सांडपाणीही जमिनीत मुरवत असल्याचे उघड झाले असून त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत, शेती यांनाही गंभीर धोका निर्माण झाला आहे.
अंबरनाथच्या अनंतनगर औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखानदारांनी त्यांच्या कंपनीतला कचरा हा प्रक्रिया केंद्रावर न टाकता एमआयडीसी परिसरातील मोकळ्या जागेवरच फेकणे सुरू केले. चिखलोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रासायनिक कचरा टाकल्याचा प्रकार समोर आल्यावर प्रदुषण नियंत्रण मंडळाने दोषी कंपनीवर कारवाईही केली. त्या घटनेला १५ दिवसही उलटत नाहीत, तोच पुन्हा या भागातील जीआयपी टँक परिसरात रासायनिक कचरा आढळला आहे. याची माहिती मिळताच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अभियंते आणि अ‍ॅडिशनल अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर असोसिएशनचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी घटनास्थळी भेट देऊन कचऱ्याची पाहणी केली. येथे अनेक वर्षांपासून कचरा टाकला जात असल्याचेही यावेळी समोर आले. त्यामुळे या प्रकरणात एमआयडीसीने पुढाकार घेत कंपन्यांत जागृती करण्याचे आवाहन प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी धनंजय पाटील यांनी केले. कंपन्यांकडून वारंवार वेगवेगळ््या ठिकाणी टाकला जाणारा कचरा थांबवण्यासाठी त्यांना सूचना देऊन त्यांच्यासाठी एक विशिष्ट जागा देण्याचे आदेशही त्यांनी दिले.
याबाबत विशेष कार्यक्र म राबवण्यासाठी कंपन्या, पालिका प्रशासन, एमआयडीसी, प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि समाजसेवी संस्थांना एकत्र बोलावून बैठक करण्याचेही आदेश त्यांनी दिले. येत्या सोमवारी याबाबत संयुक्त बैठक पार पडणार आहे. ही तपासणी सुरू असताना काही कंपन्या बेकायदा जमिनीत सांडपाणी मुरवत असल्याचे समोर आले आहे. याबाबत मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करून पाण्याचे आणि कचऱ्याचे नमुने घेतले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


पिण्याच्या पाण्याला धोका

अंबरनाथ परिसरातील दोन धरणे रासायनिक कचऱ्याच्या विळख्यात सापडल्याने पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होण्याचा धोका धडधडीतपणे समोर आला आहे. या पाण्याचे शुद्धीकरण होत असले, तरी त्यातून सर्व रसायने नष्ट होतील का, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे सुरक्षा नसलेली धरणे आणि त्यांच्या परिसरात कोणाचाही होणारा वावर किती धोकादायक बनू शकतो, ते समोर आले.

Web Title: Drinking water, serious threat to agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.