वाहनचालकाची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:46 AM2021-08-17T04:46:45+5:302021-08-17T04:46:45+5:30
मुंब्राः वाहनचालकाची फसवणूक करून रोख ४१ हजार रुपये घेऊन पोबारा केलेल्या दोघांविरोधात शिळ-डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ...
मुंब्राः वाहनचालकाची फसवणूक करून रोख ४१ हजार रुपये घेऊन पोबारा केलेल्या दोघांविरोधात शिळ-डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिव्यातील राजेंद्रबहादूर सिंह हे वाहनचालक शनिवारी वाहन चालवीत असताना इंजिन गरम झाल्याने चालक केबिनमध्ये आग लागल्याचे मुंब्रा-पनवेल रस्तावरील दहिसर नाक्याजवळ त्यांच्या निर्दशनास आले. ही माहिती टेम्पोमालकाला देण्यासाठी ते खाली उतरले. फोनवरून मालकाला माहिती देऊन ते पुन्हा टेम्पो जवळ आले. या काळात टेम्पोच्या केबिनच्या डिक्कीमध्ये ठेवलेली वरील रक्कम फसवणूक करून चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. १५ ऑगस्टला त्यांनी याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली.