पंतप्रधानांकडून चालकांचा सन्मान दिन; मात्र शासनाकडून त्यांचे पदे संपुष्ठात!

By सुरेश लोखंडे | Published: September 17, 2023 05:20 PM2023-09-17T17:20:04+5:302023-09-17T17:20:21+5:30

ठाणे : राज्य शासनाने आदेश जारी करून वाहन चालक पद संपुष्ठात आणले आहे. चालकांना पदमृत घाेषीत केलेला निर्णय मागे ...

Drivers Appreciation Day by Prime Minister; But the government terminated their positions! | पंतप्रधानांकडून चालकांचा सन्मान दिन; मात्र शासनाकडून त्यांचे पदे संपुष्ठात!

पंतप्रधानांकडून चालकांचा सन्मान दिन; मात्र शासनाकडून त्यांचे पदे संपुष्ठात!

googlenewsNext

ठाणे : राज्य शासनाने आदेश जारी करून वाहन चालक पद संपुष्ठात आणले आहे. चालकांना पदमृत घाेषीत केलेला निर्णय मागे घेऊन त्यांचे आयुर्मान वाढवण्याची मागणी करीत चालकांवरील हा अन्याय दूर करा, असे ‘वाहन चालकाचा सन्मान दिन समारंभात येथील जिल्हा परिषदेचे वाहन चालक शेलार यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रादंशीक परीवहन अधिकारी जयंत पाटील व उपप्रादेशीक परिवहन अधिकार्यांनी त्यांचा सत्कार केला.    

 पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केंद्र शासनाने वाहन चालकाचा सन्मान दिन भारत भर साजरा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार रविवारी परिवहन विभागाने या सन्मान दिनाचा कार्यकम साजरा केला. त्यावेळी जिल्हा परिषदेचे शेलार यांनी राज्य शासनाचे लक्ष वेधले. वाहान चालकांचा देशाच्या जडणघडणमध्ये मोलाचा वाटा आहे.

काेराेनामध्ये सर्व बंद असताना लसचा पुरवठा, ऑक्सिजन टॅन्कर, डेट्टबॉडी आदी क्षेत्रात वाहन चालकांनी महत्वाचे व उत्कृष्ट काम केले. त्यामूळे पंतप्रधानानी वाढदिवसाचे औचित्य साधून ‘वाहन चालकाचे सन्मान दिन’ साजरा करण्याचे आदेश पंतप्रधानांनी दिले. मात्र राज्य शासनाने कर्मचारी आकृतीबंधातून वाहन चालकांची पदे संपुष्ठात काढून चालकांवर अन्याय केल्याचे वास्तव या कार्यक्रमानिमित्त चालकांनी मांडले.

Web Title: Drivers Appreciation Day by Prime Minister; But the government terminated their positions!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.