कार अपघातात एअर बॅग उघडल्याने चालकाचे प्राण वाचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:41 AM2021-03-16T04:41:17+5:302021-03-16T04:41:17+5:30

ठाणे : कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती थेट झाडावर जाऊन आदळून उलटल्याची घटना सोमवारी सकाळी ठाण्यातील कापूरबावडी परिसरात घडली. ...

The driver's life was saved when the airbag was opened in a car accident | कार अपघातात एअर बॅग उघडल्याने चालकाचे प्राण वाचले

कार अपघातात एअर बॅग उघडल्याने चालकाचे प्राण वाचले

Next

ठाणे : कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती थेट झाडावर जाऊन आदळून उलटल्याची घटना सोमवारी सकाळी ठाण्यातील कापूरबावडी परिसरात घडली. सुदैवाने या अपघातात कारमधील एअर बॅग उघडली. त्यामुळे यात कोणीही जखमी झाले नसून, कारचे मोठे नुकसान झाल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

ही कार सचिन पाटील यांच्या मालकीची असून, साईनाथ चव्हाण हा चालक आहे. सोमवारी कासारवडवली येथून चव्हाण हा खारघर येथे जात होता. याचदरम्यान कंटेनर कारच्या पुढे गेल्याने चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि तो रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळून पुढे वेगाने महावितरणच्या खांबाला धडकल्याबरोबर कार उलटून रस्त्यावर आली. त्यामुळे या मार्गावर काही काळ वाहतूककोंडी झाली. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस, महावितरण आणि ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन क्रेनच्या मदतीने कार उचलून रस्त्यावरून हलविली. त्यानंतर घोडबंदर रोडवरील वाहतूक सुरळीत सुरू झाली.

Web Title: The driver's life was saved when the airbag was opened in a car accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.