एक्स्प्रेस गाड्या वळवल्या मध्य रेल्वेच्या एक नंबर पटरीवरून, अपघात होण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2017 02:31 PM2017-10-29T14:31:32+5:302017-10-29T14:31:53+5:30
ठाणे : फास्ट ट्रॅकच्या दोन्ही लाईन (पटरी) च्या दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे या लाईनवरील दोन्ही मार्गांच्या अप अन् डाऊनच्या प्रवासी एक्स्प्रेस व मेल गाड्या मध्य रेल्वेकडून स्लो ट्रॅक म्हणजे धीम्या गतीच्या नंबर एक व दोन नंबरच्या पटरीवरून चालवण्यात येत आहेत.
ठाणे : फास्ट ट्रॅकच्या दोन्ही लाईन (पटरी) च्या दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे या लाईनवरील दोन्ही मार्गांच्या अप अन् डाऊनच्या प्रवासी एक्स्प्रेस व मेल गाड्या मध्य रेल्वेकडून स्लो ट्रॅक म्हणजे धीम्या गतीच्या नंबर एक व दोन नंबरच्या पटरीवरून चालवण्यात येत आहेत. आता डाऊन प्रवासी गाड्यांची वाहतूक स्लो ट्रॅकवरून सुरू आहे.
या दोन्ही लाईनवरून धावणाऱ्या या गाड्यांचा स्पीड अधिक असल्यामुळे त्या क्षणार्धात येतात. यास अनुसरून या दोन्ही लाईनवरून ये-जा करू नये, अशी सूचना रेल्वेकडून दिली जात आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रवाशांसह पटरी लगतच्या झोपडपट्टीतील रहिवाशांनी लाईनजवळ रेंगाळू नये. यामुळे संभाव्य अपघात टाळणे शक्य होईल, असे जाणकारांकडून सांगितले जात आहे.
मुंबई, ठाणे, कल्याण परिसरातील मध्य रेल्वे लाईनच्या दोन्ही बाजूला झोपडपट्ट्या आहेत. रविवार सुटीचा दिवस असल्यामुळे या परिसरात पाहुण्यांची ये-जा सुरू असते. घरं लहान असल्याने पटरीलगतच्या सावलीत गप्पा-टप्पा रंगतात, त्यात मुलांना शाळेची सुटी असल्यामुळे ते अधिक काळ या पटरींच्या जवळपास रेंगाळत आहेत.
भरधाव वेगाने येणाऱ्या मेल गाड्यांचा अंदाज येत नाही, यामुळे या परिसरातील संभाव्य धोके लक्षात घेऊन मध्य रेल्वेने देखील उपाययोजना करणे अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे. रेल्वे स्टेशनवर गाडी येत असल्याचे सूचित होत आहे. पण लोकांची वर्दळ असलेल्या ठिकठिकाणी आज उपाय योजनेची गरज आहे. फ्लॅटफॉर्मवर देखील प्रवाशांची गर्दी आहे. त्याचा ताण जुन्या व अरुंद पुलांवर होऊ नये, यासाठी सुरक्षा गार्ड तैनात करण्याची गरज आहे. एलफिन्स्टनच्या घटनेनंतर काही दिवस गार्ड तैनात केले होते. पण आता ते नसल्याचे दिसून येत आहे.