हातभट्ट्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोन
By admin | Published: February 17, 2017 02:02 AM2017-02-17T02:02:28+5:302017-02-17T02:02:28+5:30
तालुक्यातील हातभट्ट्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोनचा वापर करणार असल्याची माहिती ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील
मुरबाड : तालुक्यातील हातभट्ट्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोनचा वापर करणार असल्याची माहिती ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी दिली. मुरबाडमधील एमआयडीसी हॉलमध्ये आयोजित दारूबंदी कार्यक्रमात ते बोलत होते. मुरबाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी एच.टी. व्हटकर, मुरबाड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष किसन कथोरे, नंदा गोडांबे, सुवर्णा ठाकरे, शिल्पा देहेरकर, पोलीस निरीक्षक अजय वसावे, तालुक्यातील सरपंच, पोलीस पाटील, महिला दक्षता कमिटीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वर्षभरापासून महेश पाटील यांनी सुरू केलेल्या हातभट्टीविरोधी मोहिमेमुळे जिल्ह्यातील अनेक तालुके हातभट्टीमुक्त झाले आहेत.
तरीही, काही ठिकाणी घनदाट जंगलात हातभट्ट्या सुरू असून त्या स्थानिक पोलिसांना सापडत
नसल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येईल, असे आश्वासन डॉ. महेश पाटील यांनी या कार्यक्र मात दिले .
मुरबाड तालुक्यासह संपूर्ण
ठाणे जिल्हा हा दारूमुक्त करायचा असून त्यासाठी स्थानिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. ही मोहीम यशस्वी करणाऱ्या ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच पोलीस पाटील यांचे गाव दारूमुक्त असल्याचा ठराव आम्हाला मिळाल्यास संबंधित ग्रामपंचायतीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात येईल, असेही ते म्हणाले. (वार्ताहर)