आजारपणाला कंटाळून ठाण्यात व्यसनी डॉक्टरची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 04:18 AM2018-04-16T04:18:47+5:302018-04-16T04:18:47+5:30
आजारपणाला कंटाळून नितीन गोविंदराव शिवळेकर (५९) या डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना रविवारी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. येऊरच्या ‘ह्युमिनिंग हिल्स’ या नशामुक्ती केंद्रात ही घटना घडली.
ठाणे - आजारपणाला कंटाळून नितीन गोविंदराव शिवळेकर (५९) या डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना रविवारी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. येऊरच्या ‘ह्युमिनिंग हिल्स’ या नशामुक्ती केंद्रात ही घटना घडली. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
मुंबईच्या पवई परिसरात वास्तव्यास असलेले डॉ. नितीन यांना नशेच्या गोळ्या सेवन करण्याचे व्यसन जडले होते. त्यापासून त्यांची सुटका होण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना येऊरच्या या नशामुक्ती केंद्रात दाखल केले होते. त्यांना २० वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा त्रास होता. या आजाराला कंटाळल्याने मानसिक संतुलन बिघडल्याने रविवारी पहाटेच्या सुमारास डाव्या हाताच्या मनगटावर कात्रीने कापून घेतले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली.