उल्हासनगरात नशामुक्त रॅली; आमदार, आयुक्तांसह स्वातंत्र्य सैनिकही सहभागी
By सदानंद नाईक | Published: August 8, 2023 04:20 PM2023-08-08T16:20:23+5:302023-08-08T16:21:05+5:30
महापालिका मुख्यालय मागील तरण तलाव येथील जागेत शहर स्थापनेचा शिलालेख ठेवण्यात आला
सदानंद नाईक
उल्हासनगर : शहराच्या ७४ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महापालिकेने गोलमैदान ते ऐतिहासिक शिलालेख पर्यन्त नशा मुक्त रैलीचे आयोजन केले होते. रैलीत आमदार कुमार आयलानी, आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, जमीर लेंगरेकर यांच्यासह नागरिक, पक्ष पदाधिकारी, विध्यार्थी, कॉलेज तरुण-तरुणी सहभागी झाले होते.
उल्हासनगरच्या ७४ व्या वर्धापनदिन निमित्त शहराच्या ऐतिहासिक शिलालेखसह तरण तलाव परिसर सजविण्यात आला होता. महापालिका मुख्यालय मागील ऐतिहासिक शिलालेखाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महापालिकेच्या वतीने गोलमैदान ते शिलालेख पर्यन्त नशा मुक्त रैलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी रैलीत आमदार कुमार आयलानी, आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, जमीर लेंगरेकर, मुख्यालय उपायुक्त अशोक नाईकवाडे, दिपक जाधव आदींनी सहभाग घेत हातात नशा मुक्तीचे पोस्टर घेऊन नागरिकांत नशा बाबत जनजागृती करण्यात आली. तर कॉलेज तरुणांनी नशामुक्ती बाबत पदनाट्याचे आयोजन करण्यात आले. तसेच आमदार कुमार आयलानी व आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्यात आला.
महापालिका मुख्यालय मागील तरण तलाव येथील जागेत शहर स्थापनेचा शिलालेख ठेवण्यात आला असून शिलालेखाचे पवित्रता ठेवण्यासाठी एक स्मारक उभे करण्याची मागणी होत आहे. शहरातील सामाजिक संस्था, विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी व नागरिकांनी शिलालेखाचे पूजन केले. वर्धापनदिना निमित्त सिंधी अकादमीचे कार्याध्यक्ष महेश सुखरामनी, महापालिका परिवहन समिती सभापती सुभाष तानावाडे, दिनेश पंजाबी, एसएसटी कॉलेजचे तरुण-तरुणी, सिंधू एज्युकेशन सोसायटी, रोटरी क्लब ऑफ सिंधू नगर, भविष्य फाऊंडेशन यांच्यासह इतर सामाजिक संस्थेचे पदाधिकारी स्थापना दिवसात सहभागी आले होते. तर स्थापना दिवसांनिमित्त शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा विडा सर्वांनी उचलायला हवा. असे आवाहन आयुक्त अजुज शेख यांनी केले