कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता औषध दुकानांचीही वेळ मर्यादित; केमिस्ट असोसिएशनचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 04:57 PM2020-06-28T16:57:14+5:302020-06-28T16:57:24+5:30

केडीएमसी परिक्षेत्रत अनलॉक 1 मध्ये 5 जूनपासून सम-विषम तारखेप्रमाणो सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेर्पयत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Drug stores are also limited in time due to the prevalence of corona; Decision of Dombivli Chemists Association | कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता औषध दुकानांचीही वेळ मर्यादित; केमिस्ट असोसिएशनचा निर्णय

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता औषध दुकानांचीही वेळ मर्यादित; केमिस्ट असोसिएशनचा निर्णय

Next

डोंबिवली:  शहरात दिवसेंदिवस कोरोना चा प्रादुर्भाव वाढत आहे. औषधांच्या निमित्ताने नागरिक दिवसभर घराबाहेर पडत आहे. यावर नियंत्रण यावे तसेच नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे या करता औषध दुकानांची वेळ मर्यादित करण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत तर रविवारी सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत औषध दुकान सुरू राहतील असा निर्णय डोंबिवली केमिस्ट असोसिएशनच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे.

केडीएमसी परिक्षेत्रत अनलॉक 1 मध्ये 5 जूनपासून सम-विषम तारखेप्रमाणो सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेर्पयत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सोशल डिस्टन्स आणि अन्य अटींच्या आधारे दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली असलीतरी सोशल डिस्टन्स धाब्यावर बसविले जात असल्याचे चित्र बहुतांश ठिकाणी पाहायला मिळत आहे. एकिकडे कल्याण डोंबिवलीत कोरोना रूग्णांचा आकडा वाढत असताना त्याचे कोणतेही गांभिर्य नागरीकांना राहीलेले नसल्याचे एकुण शहरातील वास्तव पाहता स्पष्ट होत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कन्टेटमेंट झोनमध्ये मात्र आता कडक र्निबध घालण्यात आले आहेत. 

दरम्यान औषधांच्या निमित्तानेही नागरीक दिवसभर घराबाहेर पडत आहेत. यावर नियंत्रण रहावे म्हणून डोंबिवली केमिस्ट असोसिएशनने आता औषध दुकानांची वेळ मर्यादित केली आहे. अत्यावश्यक प्रसंगी रु ग्णांनी दुकानाबाहेरील क्र मांकावर संपर्क केल्यास औषधी उपलब्ध करून देण्यात येतील. एकाही रु ग्णाला औषधांची कमतरता भासणार नाही असे डोंबिवली केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप देशमुख, सचिव विलास शिरु डे यांनी सांगितले आहे. इमर्जन्सी मध्ये 09702400111 , 09702665111 , 08691091055 या क्र मांक वर संपर्क करावा असे आवाहन असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Drug stores are also limited in time due to the prevalence of corona; Decision of Dombivli Chemists Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.