लॉकडाऊनमध्येही औषधपुरवठा सुरूच, क्षय नियंत्रण विभागाचा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 02:27 AM2020-04-29T02:27:20+5:302020-04-29T02:27:27+5:30
राज्याच्या क्षय नियंत्रण विभागाकडून या क्षयग्रस्त रु ग्णांवर लक्ष ठेऊन त्यांना आवश्यक औषधे पोहचविण्याचे काम केले जात आहे.
ठाणे : देशामध्ये दर तीन मिनिटाला क्षयरु ग्णाचा मृत्यू होतो. क्षयरोगाची लागण झालेला व्यक्ती मानवी बॉम्ब म्हणून ओळखली जाते. यामुळे राज्याच्या क्षय नियंत्रण विभागाकडून या क्षयग्रस्त रु ग्णांवर लक्ष ठेऊन त्यांना आवश्यक औषधे पोहचविण्याचे काम केले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्षयग्रस्त रु ग्णांना उपचारदारम्यान एक विषय कोड देण्यात आल्याने त्यांना शोधून काढणे शक्य झाले आहे.
सध्या कोरोना व्हायरसमुळे देशात भयाचे वातावरण पसरले. राज्यातही कोरोनाने आघाडी घेतली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा कोरोना रु ग्णांवर उपचार करण्यात व्यस्त झालेली दिसते आहे. मात्र, असे असले तरी देशात क्षयरोगानेदेखील थैमान घातलेले आहे. दर तीन मिनिटाला या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीचा मृत्यू होतो. त्यामुळे कोरोनाच्या काळातही राज्याच्या क्षय नियंत्रण विभागाने अशा रु ग्णांना मोफत औषधे पुरविण्यात खंड पडू दिलेला नाही. कोरोनामुळे देशात लॉकडाउन सुरू आहे. राज्यातही तो अधिक दक्षतेने पाळला जात आहे. यामुळे हातावर पोट असलेले बांधकाम मजूर, नाकाकामगार, असंघिटत कामगार बेकार झाले आहेत. बांधकामांच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना ठेकेदारांनी वाºयावर सोडल्याने त्यांचे तांडे रस्त्याने गावाकडे जायला निघाले आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात क्षयग्रस्त असल्याचे समोर आले आले आहे.
।असा घेतला जातोय रुग्णांचा शोध
मुंब्रा, भिवंडी, मानखुर्द, गोवंडी आदीसारख्या विभागात क्षयग्रस्त मजुरांची संख्या जास्त आहे. यामुळे राज्याच्या क्षय रोग नियंत्रण विभागाच्या वतीने त्यांना क्षयाची औषधे मोफत दिली जातात. मात्र, यापैकी बरेच मजूर मुंबईच्या बाहेर गेल्याने, तसेच इतर भागात अडकून पडल्याने त्यांना औषधे मिळणार की नाही, हा सवाल रु ग्णांच्या मनात आला आहे. मात्र, अशा रु ग्णांचा ज्या जिल्ह्यात किंवा पालिकेच्या हद्दीत उपचार सुरू आहे.
।तेथे त्याचा विशेष कोड नोंद असल्याने त्याला शोधून काढणे शक्य होत आहे. या कोडमध्ये रु ग्णाचे संपूर्ण, नाव, गावाचा व कामाच्या ठिकाणाचा पत्ता, मोबाइल क्र मांक अशी सगळी माहिती नोंद आहे. त्या आधारे राज्याचे क्षय नियंत्रण विभाग क्षयग्रस्त रु ग्णांशी संपर्क करण्यात यशस्वी होत आहे. रु ग्ण ज्या ठिकाणी, ज्या जिल्ह्यात, ज्या राज्यात आहे, तेथील क्षय नियंत्रण विभागाशी संपर्क साधून त्यांना औषधे आणि सकस आहार दिला जात आहे.