उत्तरप्रदेशच्या दोन आरोपींकडून १.८0 लाखाचे चरस ठाण्यात जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 07:37 PM2018-02-21T19:37:06+5:302018-02-21T19:39:38+5:30

अंमली पदार्थ विक्रीच्या गुन्ह्याला नुकतीच सुरूवात केलेल्या दोन तरूणांना ठाणे पोलिसांनी सोमवारी गजाआड केले. त्यांच्याकडून आणखी एका आरोपीची माहिती उघडकीस आली आहे.

Drug worth Rs 1.80 lakhs seized from two accused from Uttar Pradesh in Thane | उत्तरप्रदेशच्या दोन आरोपींकडून १.८0 लाखाचे चरस ठाण्यात जप्त

thane

Next
ठळक मुद्देठाण्याच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाईउत्तरप्रदेशच्या आणखी एका आरोपीची माहिती उघडकीसआरोपी नेपाळमधून आणायचे चरस

ठाणे : नेपाळमधून चरस आणून ठाणे, मुंबई परिसरात त्याची विक्री करणार्‍या उत्तरप्रदेशच्या दोन युवकांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने सोमवारी ठाण्यात अटक केली. त्यांच्याजवळून १ लाख ८0 हजार रुपयांचे चरस पोलिसांनी हस्तगत केले.
सलमान शाह जमीन अहमद शाह आणि शिवकुमार शर्मा ही या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. ते चरस विक्रीच्या धंद्यात गुंतल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोडसे यांना मिळाली होती. त्यानुसार आरोपींची माहिती काढली असता, टॉवर नाक्यावरील शिवाजी मैदानाजवळ ते येणार असल्याचे सुत्रांकडून समजले. आरोपींना अटक करण्यासाठी या भागात सापळा रचण्यात आला. सोमवारी दुपारी १.३0 वाजताच्या सुमारास या भागात २0 वर्षाचा तरूण आला. हालचाली संशयास्पद आढळल्याने पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतले. अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ ९00 ग्रॅम चरस आढळले. या चरसची किंमत १ लाख ८0 हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीचा मोबाईल फोन आणि १५0 रुपये रोख पोलिसांनी हस्तगत केले.
सलमान शाहने चरसचा साठा काल्हेर येथील शिवकुमार शर्मा याच्याकडून विक्रीसाठी घेतला होता. सलमानला अटक केल्यानंतर त्याने ही माहिती पोलिसांना दिली. त्याच्या जबाबावरून पोलिसांनी शिवकुमारलाही अटक केली. दोन्ही आरोपींना न्यायालयाने २७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. शिवकुमारने चरस कुठून आणले, याची माहिती काढण्याचा प्रयत्नही पोलिसांनी केला. त्यानुसार उत्तरप्रदेशच्या आणखी एका आरोपीचे नाव समोर आले. या तिसºया आरोपीचे नेपाळमध्ये धागेदोरे असून, त्याचा शोध सुरू आहे. सलमान शाह हा भंगार विक्रीचे काम करीत असून, शिवकुमार शर्मा एका सलुनमध्ये कामाला आहे. दोघेही मुळचे उत्तरप्रदेशातील सिद्धार्थनगरचे रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आरोपीला कर्करोग
चरस विक्रीच्या आरोपाखाली अटक केलेल्या शिवकुमार शर्मा (२२) हा बालवयापासून तंबाखूच्या अधिन गेला होता. त्यामुळे त्याला कर्करोग झाला आहे. या आजाराच्या औषधोपचारासाठी पैसे नसल्याने तो गुन्हेगारी क्षेत्राकडे वळला. शिवप्रकाश आणि सलमान या दोन्ही आरोपींचा हा पहिलाच गुन्हा होता. चरस विक्रीतून त्यांना पाच हजार रुपये नफा मिळणार होता.

Web Title: Drug worth Rs 1.80 lakhs seized from two accused from Uttar Pradesh in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.