भिवंडीतून एक कोटी १३ लाखांच्या ब्राऊन शुगरसह अमली पदार्थ हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 09:41 PM2020-12-22T21:41:34+5:302020-12-22T21:46:33+5:30

ब्राऊन शुगर आणि एमडी पावडरची तस्करी करणाऱ्या जाहीद शेख आणि ईश्वर मिश्रा या दोघांना भिवंडी पिसे रोडवरील सावद येथून ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून एक कोटी १३ लाख ७९ हजारांचे ब्राऊन शुगरसह अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहे.

Drugs along with brown sugar worth Rs 1.13 crore seized from Bhiwandi | भिवंडीतून एक कोटी १३ लाखांच्या ब्राऊन शुगरसह अमली पदार्थ हस्तगत

ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Next
ठळक मुद्दे तस्करी प्रकरणी दोघांना अटक ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ब्राऊन शुगरसह अमली पदार्थांची तस्करी करणाºया जाहीद शेख (३०, रा. मुठवल, भिवंडी) आणि ईश्वर मिश्रा (३९, रा. उत्तरप्रदेश) या दोघांना भिवंडी पिसे रोडवरील सावद येथून ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून एक कोटी १३ लाख ७९ हजारांचे ब्राऊन शुगर आणि एमडी पावडर हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनिल जाधव, भास्कर जाधव आदींचे पथक २१ डिसेंबर रोजी गणेशपुरी मुरबाड उपविभागामध्ये पेट्रोलिग करीत होते. त्यावेळी पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सावद नाका येथून पिसा डॅमच्या दिशेने जाणाºया रस्त्यावर दोघेजण एका उभ्या असलेल्या मोटारकारमध्ये संशयास्पदरित्या आढळले. त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्यामुळे त्यांना या पथकाने ताब्यात घेतले. जाहीद आणि ईश्वर अशी आपली नावे सांगणाºया या दोघांच्या कारची या पथकाने झडती घेतली. तेंव्हा त्यांच्या कारमधील डिक्कीतील डब्यातून एक किलो ७० ग्रॅम वजनाचा ब्राऊन शुगर आणि एक किलो ७०० ग्रॅम वजनाची एमडी पावडर तसेच एक डिजिटल वजन काटा असा एक कोटी १३ लाख ८९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा दाखल करुन दोघांनाही अटक केली आहे. त्यांनी या गुन्हयाची कबूलीही दिली आहे. पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. दोन्ही आरोपींना २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

Web Title: Drugs along with brown sugar worth Rs 1.13 crore seized from Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.