सव्वा लाखांच्या चरससह अमली पदार्थांच्या तस्कराला ठाण्यातून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 09:20 PM2020-01-14T21:20:16+5:302020-01-14T21:36:19+5:30

अमली पदार्थांच्या तस्करीसाठी दिवा भागात आलेल्या जुबेर कुरेशी या तस्कराला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने सापळा रचून मंगळवारी अटक केली. त्याच्याकडून एक लाख २० हजारांचे चरसही हस्तगत करण्यात आले आहे.

Drugs smuggler arrested for drug trafficking in Diva, Thane | सव्वा लाखांच्या चरससह अमली पदार्थांच्या तस्कराला ठाण्यातून अटक

ठाणे मध्यवर्ती शोध पथकाची कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देठाणे मध्यवर्ती शोध पथकाची कारवाईडायघर पोलीस ठाण्यात गुन्हासव्वा लाखांचे चरस हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शीळ डायघर भागात चरस तस्करीसाठी आलेल्या जुबेर रईस कुरेशी (३३, रा. दिवा, ठाणे) याला चरस या अंमली पदार्थाची विक्री करतांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने मंगळवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. त्याच्याकडून एक लाख २० हजारांचे सुमारे ६०० ग्रॅम चरस हस्तगत केले आहे.
चरस हा अंमली पदार्थ विक्र ीसाठी एक व्यक्ती शीळफाटा परिसरात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव यांना मिळाली होती. त्या आधारे १३ जानेवारी रोजी रात्री कुरेशी याला ५९४ ग्रॅम चरससह ताब्यात घेतले. होनराव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अशोक शेंडगे, उपनिरीक्षक विठ्ठल चिंतामण, जमादार विजयकुमार राठोड आणि पोलीस हवालदार गणेश वाघमोडे आदींच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. याप्रकरणी डायघर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध १४ जानेवारी रोजी पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. त्याला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

Web Title: Drugs smuggler arrested for drug trafficking in Diva, Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.