नशेसाठी वापरली जाणारी औषधे जप्त; एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 11:55 PM2017-10-31T23:55:46+5:302017-10-31T23:55:57+5:30
नशेसाठी वापरल्या जाणा-या खोकल्याच्या औषधांचा ८५ हजार रुपयांचा साठा, ठाण्याच्या अमली पदार्थविरोधी पथकाने सोमवारी कळव्यातून जप्त केला. या प्रकरणी भिवंडीच्या युवकास अटक केली असून, अन्य एकाचा शोध सुरू आहे.
ठाणे : नशेसाठी वापरल्या जाणा-या खोकल्याच्या औषधांचा ८५ हजार रुपयांचा साठा, ठाण्याच्या अमली पदार्थविरोधी पथकाने सोमवारी कळव्यातून जप्त केला. या प्रकरणी भिवंडीच्या युवकास अटक केली असून, अन्य एकाचा शोध सुरू आहे.
खोकल्याच्या उपचारासाठी औषधांच्या दुकानांमध्ये मिळणाºया औषधी द्रव्याचा नशेसाठी सर्रास वापर केला जातो. अशाच प्रकारच्या रेक्सस कंपनीच्या कफ सिरपच्या बाटल्यांचा साठा एका युवकाजवळ असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोडसे यांना मिळाली होती. त्यानुसार, त्यांच्या पथकाने रेतीबंदर रोडवरील खारेगाव टोल नाक्याच्या पुलाखालून भिवंडी येथील वसीम नुरू जमा खान याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ कफ सिरपच्या ८५ हजार ५६0 रुपयांच्या ७१३ बाटल्या सापडल्या. आरोपीच्या अंगझडतीत अंधेरीतील एका केमिस्टची पावती सापडली. या दुकानातून जवळपास ५० हजार रुपयांच्या कफ सिरपच्या बाटल्या आरोपीने विकत घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.