एक्स्प्रेसमध्ये मद्यधुंद कामगार; दोन सफाई कर्मचा-यांची प्रवाशांना दमदाटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 04:21 AM2017-12-16T04:21:47+5:302017-12-16T04:21:56+5:30

कुर्ला टर्मिनस येथून निघालेली शालिमार एक्स्प्रेस ठाणे स्टेशनला येऊन थांबली. या प्रवासादरम्यान मद्यधुंद असलेल्या दोन सफाई कामगारांनी वेटिंग तिकीट असलेल्या व बाथरूमजवळील मोकळ्या जागेत बसलेल्या प्रवाशास दमदाटी करून हुज्जत घातली.

Drunken workers in the expressway; Two cleaning workers are self-confident | एक्स्प्रेसमध्ये मद्यधुंद कामगार; दोन सफाई कर्मचा-यांची प्रवाशांना दमदाटी

एक्स्प्रेसमध्ये मद्यधुंद कामगार; दोन सफाई कर्मचा-यांची प्रवाशांना दमदाटी

Next

- सुरेश लोखंडे

ठाणे : कुर्ला टर्मिनस येथून निघालेली शालिमार एक्स्प्रेस ठाणे स्टेशनला येऊन थांबली. या प्रवासादरम्यान मद्यधुंद असलेल्या दोन सफाई कामगारांनी वेटिंग तिकीट असलेल्या व बाथरूमजवळील मोकळ्या जागेत बसलेल्या प्रवाशास दमदाटी करून हुज्जत घातली. एवढेच नव्हे तर त्याची बॅग हिसकावण्याचाही प्रयत्न केला. ठाणे स्टेशन सोडल्यानंतरही या कामगारांची दमदाटी सुरूच असल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली.
ठाणे येथून रात्री सुमारे १०.१५ वाजेदरम्यान ही गाडी कल्याणच्या दिशेने जात असताना या सफाई कामगारांनी प्रवाशाची बॅग हिसकावून फेकण्याचादेखील प्रयत्न केला.कल्याणपर्यंत तरी त्यांची ही दहशत सुरूच होती. कल्याणला उतरण्यासाठी काही जण आधीच दरवाजात आले. त्यांच्या ही मनमानी लक्षात आली. भीती वाटणाºया कामगारांचा अवतार पाहून कोणीही पुढे येऊन बोलण्यास तयार नव्हते. या वेळी काही जणांनी एकत्र येऊन ही मनमानी थांबवण्याचा प्रयत्न केला. रात्री-बेरात्री बाथरूमला येणाºया महिला प्रवाशांनादेखील या मद्यधुंद कामगारांचा त्रास होण्याची शक्यता लक्षात घेऊन संबंधित बोगीतील टीसी व स्टेशनमास्तरच्या निदर्शनात हा प्रकार आणून देण्यात आला.
रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधील बाथरूमसफाईसाठी खाजगी ठेकेदाराद्वारे सफाई कामगार नेमण्यात आले आहेत. पण, तसे फारसे उपयुक्तही ठरत नसलेल्या या कामगारांची दहशत मात्र जीवघेणी ठरत आहे. मद्यधुंद अवस्थेतील हे कामगार बोगीत रात्री-बेरात्री कारण नसतानाही हिंडत असतात. त्यांचे वर्तनही योग्य नसल्याचे आढळून येते. त्यांच्यातील काही कर्मचारी गुन्हेगारी प्रवृत्तीचे असण्याची दाट शक्यता आहे. या मद्यधुंद अवस्थेतील कामगारांपासून महिला प्रवाशांच्या जीवावर बेतण्याचा अतिप्रसंग व चीजवस्तू लांबवण्याच्या दुर्घटना होण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देण्याची अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

प्रवाशांत भीती
कल्याण स्टेशन येईपर्यंत या कामगारांचा धुमाकूळ सुरूच होता. ते मोठमोठ्याने आवाजही करत होते. ते कोणाचे ऐकूनही घेत नव्हते. बोगी क्रमांक-४ मधील हा प्रकार टीसींच्या निदर्शनात आणून दिला. यानंतर, त्यांनी संबंधित मुकादमाच्या लक्षात आणून दिले. यानंतर, या कामगारांना उतरवून देणे अपेक्षित होते किंवा जीआरपीच्या ताब्यात देणे गरजेचे होते. पण, कारवाई झाली नाही. यामुळे या प्रवाशांमध्ये भीती आहे.

Web Title: Drunken workers in the expressway; Two cleaning workers are self-confident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे