मद्यधुंद तरुणीचा भररस्त्यावर चालबाजपणा; वाहनचालकांना शिव्यांची लाखोली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:48 AM2021-09-04T04:48:20+5:302021-09-04T04:48:20+5:30

अंबरनाथ: अंबरनाथ पूर्वेतील लोकनगरी बायपासवर गुरुवारी सायंकाळी एका मद्यधुंद तरुणीने चालबाजमधील श्रीदेवीच्या भूमिकेला लाजवेल, असा गोंधळ भररस्त्यावर घातला. भरधाव ...

The drunken young woman's dexterity; Millions of insults to motorists | मद्यधुंद तरुणीचा भररस्त्यावर चालबाजपणा; वाहनचालकांना शिव्यांची लाखोली

मद्यधुंद तरुणीचा भररस्त्यावर चालबाजपणा; वाहनचालकांना शिव्यांची लाखोली

Next

अंबरनाथ: अंबरनाथ पूर्वेतील लोकनगरी बायपासवर गुरुवारी सायंकाळी एका मद्यधुंद तरुणीने चालबाजमधील श्रीदेवीच्या भूमिकेला लाजवेल, असा गोंधळ भररस्त्यावर घातला. भरधाव वाहनांसमोर उभे राहून ती थांबवण्याचा प्रयत्न तिने केला. एवढेच नव्हे तर वाहनचालकांना शिवीगाळ करून त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. अखेर नागरिकांनी पोलिसांना बोलवल्यानंतर ती आपल्या मित्राच्या गाडीवर बसून पसार झाली.

लोकनगरी रस्त्यावर सायंकाळच्या वेळेस तरुण आणि तरुणी घोळक्याने बसायला येत असतात. या ठिकाणी मोठी गर्दी होत असते. कट्ट्यावर बसून गप्पा मारण्यासाठी तरुणांचे टोळके याठिकाणी येत असल्याने कायमस्वरूपी त्या ठिकाणी पोलिसांची गस्तदेखील सुरू असते; मात्र गुरुवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास एक तरुणी मद्यधुंद अवस्थेत रस्त्याच्या मध्यभागी उभे राहून वाहने रोखण्याचा प्रयत्न करीत होती. वाहने थांबल्यानंतर त्या वाहनांना पायाने लाथ मारून वाहनचालकांना शिवीगाळ करीत होती. तिच्या या असभ्य वागणुकीला एका तरुणाने विरोध केल्यानंतर तिने थेट त्या मुलाला शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर तिने त्या तरुणासोबत असलेल्या मैत्रिणीलादेखील शिवीगाळ केली. तिला रोखण्याचा अनेकांनी प्रयत्न केला; मात्र तिला जो कोणी रोखण्याचा प्रयत्न करीत होता त्या प्रत्येकाला ती शिव्यांची लाखोली वाहत होती. एवढेच नव्हे तर प्रत्येकाच्या अंगावर धावून जात होती. अखेर स्थानिक रहिवाशांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस येणार, याची भनक लागताच तिच्या मित्राने तिला गाडीवर बसून तेथून पळ काढला. यापुढे असे प्रकार होऊ नयेत, यासाठी या रस्त्यावर पोलिसांनी गस्त वाढवण्याची गरज व्यक्त होत आहे.

--------

Web Title: The drunken young woman's dexterity; Millions of insults to motorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.