उत्तम फोटोग्राफरसाठी डीएसएलआरला पर्याय नाही...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 01:13 AM2020-08-19T01:13:46+5:302020-08-19T01:13:59+5:30
मात्र उत्तम फोटोग्राफर होण्यासाठी डीएसएलआर फोटोग्राफीला पर्याय नाही, असे मत फोटोग्राफी क्षेत्रातील तज्ज्ञांनी ‘जागतिक फोटोग्राफी दिना’च्या निमित्ताने व्यक्त केले.
स्नेहा पावसकर
ठाणे : आज प्रत्येकाच्या हातात मोबाइल आहे. त्या मोबाइलने सेल्फी किंवा फोटो न काढणारा माणूस विरळाच. आपण काढलेले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आणि त्याला लाइक्स आले की, आपल्याला जणू फोटोग्राफर झालो, असे अनेकांना वाटते. फोटोग्राफीची आवड निर्माण होण्यासाठी मोबाइल फोटोग्राफी हा उत्तम पर्याय आहे; मात्र उत्तम फोटोग्राफर होण्यासाठी डीएसएलआर फोटोग्राफीला पर्याय नाही, असे मत फोटोग्राफी क्षेत्रातील तज्ज्ञांनी ‘जागतिक फोटोग्राफी दिना’च्या निमित्ताने व्यक्त केले.
आज प्रत्येक जण मोबाइल घेताना त्याचा कॅमेरा किती मेगापिक्सलचा आहे, ते पाहतात. जास्तीतजास्त चांगल्या दर्जाचा कॅमेरा असणारा मोबाइल घेतला जातो. कोणत्याही छोट्यामोठ्या क्षणांचे फोटो मोबाइलमध्ये टिपले जातात. हे सगळं हातातल्या मोबाइलनं शक्य झालंय. विशेषत: तरुणाई फोटोग्राफीच्या बाबतीत अधिक क्रिएटिव्ह झाली आहे. त्यांचा अवेरनेस वाढलाय. त्यातच मोबाइलमधील अॅपमुळे फोटो एडिट करून कोलाज, डिझाइनही होतात. एक चांगला फोटोग्राफर घडण्याची ही सुरुवात असू शकते; पण म्हणून मोबाइल फोटोग्राफी ही टेक्नोलॉजीच्या पातळीवर टिकत नाही. मोबाइल फोटोग्राफीला काही मर्यादा आहेत.
मोबाइलवर गुळगुळीत, क्लिअर दिसणारा फोटो प्रिंट झाल्यावर मात्र तितका क्लिअर येत नाही, हे वास्तव आहे. मोबाइल फोटोग्राफीमुळे अनेकांना आपण चांगले फोटोग्राफर आहोत किंवा होऊ शकतो असे वाटू लागल्याने गेल्या काही वर्षांत फोटोग्राफर म्हणून करिअर घडवू पाहणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र याच मोबाइल फोटोग्राफीमुळे फोटो प्रिंट होण्याचे प्रमाण प्रचंड कमी झाले आहे.
पूर्वी छोट्यामोठ्या सोहळ्यांचेही फोटो काढून ते अल्बम केले जायचे; मात्र आता काही जण तर लग्नाचे फोटोही प्रिंट करीत नाहीत, याचा परिणाम आमच्या व्यवसायावर झाल्याचे मत युवा फोटोग्राफी कलादिग्दर्शिका अर्चना देशपांडे-जोशी यांनी व्यक्त केले.
>कोरोनाकाळात फोटोसेशनही झाले आॅनलाइन
कोरोनाच्या काळात सगळ्यांचे उद्योगव्यवसाय बुडालेत. सण-उत्सव, समारंभ नसल्याने फोटोग्राफरचीही तीच परिस्थिती आहे. यावर उपाय शोधून काढत अर्चना देशपांडे-जोशी यांनी आॅनलाइन फोटोसेशन केले आहे. फोटोसेशनची आॅर्डर असली तरी इच्छुकांच्या घरी किंवा इतर कुठे जाता येत नसल्याने त्यांनी फोटो काढू इच्छिणाºया महिलेला फोटोच्या थीमनुसार घरी सेटिंग करायला सांगितली आणि कॅमेरा आॅन करून आॅनलाइन फोटोग्राफी केली. आपल्याप्रमाणेच इतरही अनेक फोटोग्राफरनी यानुसार आॅनलाइन फोटोसेशन केल्याचेही त्यांनी सांगितले.