धुकटन जलशुद्धीकेंद्राची सुरक्षा धोक्यात

By Admin | Published: March 6, 2016 01:41 AM2016-03-06T01:41:18+5:302016-03-06T01:41:18+5:30

पेल्हार धरणाची सुरक्षा धोक्यात असल्याची माहिती दैनिक लोकमतमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर आता धुकटन येथील जलशुद्धीकरण केंद्रात सुरक्षा रक्षक आणि कर्मचारी नसल्याने तेथील

Duckling water purifier security threat | धुकटन जलशुद्धीकेंद्राची सुरक्षा धोक्यात

धुकटन जलशुद्धीकेंद्राची सुरक्षा धोक्यात

googlenewsNext

शशी करपे,  वसई
पेल्हार धरणाची सुरक्षा धोक्यात असल्याची माहिती दैनिक लोकमतमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर आता धुकटन येथील जलशुद्धीकरण केंद्रात सुरक्षा रक्षक आणि कर्मचारी नसल्याने तेथील सुरक्षेची पुरती वाट लागली आहे. धरणांच्या सुरक्षेकडे वसई विरार पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने संतापलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शहर अभियंत्यांना घेराव घातला.
पेल्हार धरणावर सुरक्षा रक्षक नसल्याने त्याठिकाणी गैरधंद्यांना ऊत आल्याची सचित्र माहिती दैनिक लोकमतमध्ये प्रसिद्ध झाली होती. वसई विरार महापालिकेच्या पेल्हार प्रभाग कार्यालयापासून अवघ्या एक दीड किलोमीटर अंतरावर पेल्हार धरण आहे. मात्र, त्याच्या सुरक्षिततेकडे पालिका दुर्लक्ष करीत आहे. त्यातच आता पालिकेच्या मुख्यालयापासून शंभर-दीडशे किलोमीटर दूर असलेल्या धुकटन जलशुद्धीकरण केंद्राची सुरक्षा धोक्यात आली असून पालिकेच्या अधिकाऱ्यांना मात्र त्याचा काहीच थांगपत्ता नसल्याची संतापजनक बाब उजेडात आली आहे.
विरार शिवसेना शहरप्रमुख दिलीप पिंंपळे यांनी शिवसैनिकांसह अचानक या केंद्राला भेट दिली. त्यावेळी एकही कर्मचारी अथवा सुरक्षा रक्षक जागेवर नव्हता. संपूर्ण परिसरात सामान्य माणसाला फिरण्यास आणि फोटो काढण्यास प्रतिबंध आहे. असे असताना शिवसैनिक तास-दोन तास याठिकाणी फिरत होते. त्यांनी फोटोही काढले. पण, कुणीही अटकाव केला नाही. लॅब ओस पडली होती. त्याठिकाणी दारुच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या. साफसफाई नसल्याने लॅबमधील सामुग्री धूळ खात पडली आहे.
संपूर्ण परिसरात कुणीही बिनधास्त वावरू शकत असल्याचे दिसून येत होते. लॅबमध्ये तंत्रज्ञ नसल्याने शुद्धीकरण झालेल्या पाण्याची तपासणीसुद्धा होत नसल्याने पालिका लाखो लोकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप पिंंपळे यांनी केला आहे.
जलशुद्घीकरण केंद्रातून वाया जाणारे पाणी आजूबाजूच्या
शेतात सोडले जात असल्याने यापरिसरातील २२ एकर शेतजमिन धोक्यात आली आहे. तशा शेतकऱ्यांच्या तक्रारी असल्याची माहिती पिंंपळे यांनी दिली.
या प्रसंगी उपतालुका प्रमुख संजय राऊत, शहर संघटक ज्योति पवार, उपतालुका संघटक वैशाली कदम, उपशहर प्रमुख नरेश वैद्य, प्रदीप साने, उदय जाधव, जितेंद्र राऊत, कार्यालय प्रमुख रमाकांत चव्हाण, विभाग प्रमुख विनायक भोसले, दिपक चव्हाण, संजय खाडे, हरिचंद्र पाटील, महिला आघाडी उपशहर संघटक
श्रद्धा जाधव, शिला लष्करे रेखा रायकर, पूजा सावंत, जयसिंंग
ठाकूर, शैलेश देसाई, मिलिंंद वैद्य, रमेश गुरव, दिनेश मार्गी, केयूर वरवटकर, सुधाकर सतनकर, रोशन जाधव,दिनेश दयाल, संजय कदम इत्यादी व अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: Duckling water purifier security threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.