माळशेज घाट बंद पडल्याने छोटेमोठे धंदे बंद

By admin | Published: July 17, 2017 01:15 AM2017-07-17T01:15:41+5:302017-07-17T01:15:41+5:30

माळशेज घाट बंद असल्यामुळे नगर-कल्याण हाय वे वरील छोटेमोठे धंदे बंद झाले आहेत. वास्तविक, टोकावडे नाक्यावर दररोज लाखो

Due to the closure of the Malshej Ghat, small businesses are closed | माळशेज घाट बंद पडल्याने छोटेमोठे धंदे बंद

माळशेज घाट बंद पडल्याने छोटेमोठे धंदे बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
टोकावडे : माळशेज घाट बंद असल्यामुळे नगर-कल्याण हाय वे वरील छोटेमोठे धंदे बंद झाले आहेत. वास्तविक, टोकावडे नाक्यावर दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते, पण चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने नाक्यावरील रिक्षा तसेच जीपचालक, भाजीवाले यांच्या धंद्यावर मोठा परिणाम झाला आहे. माळशेज घाट येथील रहिवासी तसेच ९० गावांतील लोकांच्या उदरनिर्वाहाचे साधन असून घाट बंद ठेवल्यास येथील लोकांवर उपासमारीची वेळ येऊ शकते.
दरम्यान, माळशेज घाट बंद केला केल्याने घाटमार्गे नगरवरून येणारे दूध, कोंबडी, भाजीपाला अशा जीवनावश्यक वस्तू मुंबईत येत नाहीत. तसेच घाट बंद असल्याबाबत मुरबाड आणि सरळगाव येथे बॅनर लावले असले, तरीही हौशी पर्यटक त्याकडे कानाडोळा करत घाटात जात आहेत.

Web Title: Due to the closure of the Malshej Ghat, small businesses are closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.